बोर प्रकल्पाची डागडुजी दुर्लक्षित
By Admin | Updated: December 1, 2014 22:59 IST2014-12-01T22:59:22+5:302014-12-01T22:59:22+5:30
सेलू तालुक्यातील हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यात हातभार लागलेल्या बोरधरणाला २०१४ मध्ये ५० वर्षे पूर्ण झालीत़ हरितक्रांतीचे स्वप्न दाखविणाऱ्या या धरणाचा उद्देश कालव्याची बिकट परिस्थिती,

बोर प्रकल्पाची डागडुजी दुर्लक्षित
बोरधरण : सेलू तालुक्यातील हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यात हातभार लागलेल्या बोरधरणाला २०१४ मध्ये ५० वर्षे पूर्ण झालीत़ हरितक्रांतीचे स्वप्न दाखविणाऱ्या या धरणाचा उद्देश कालव्याची बिकट परिस्थिती, कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे अर्थवट राहिला आहे. कित्येक वर्षांपासून प्रकल्पाची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली नाही़ यामुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा स्पष्ट होत आहे़
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर झाडा-झुडपांनी वेढलेल्या उंच टेकड्यांच्या मधोमध १९५७ मध्ये सुमारे जवळपास ८ वर्षांच्या प्रदीर्घ परिश्रमानंतर बोरधरण बांधण्यात आले़ या धरणाला यशवंत धरण म्हणून ओळखले जाऊ लागले़ धरणाचे क्षेत्रफळ १४५५ हेक्टर असून धरणापासून २१ किमीचा मुख्य कालवा आहे. बोरधरणाच्या कालव्याची डागडुजी, देखभाल व रंगरंगोटीकरिता शासनाकडून भरपूर निधी येतो; पण कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराने व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे धरणाचे खस्ताहाल झाले आहे़ धरणाच्या मुख्य भिंतीवर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढलेली आहेत़ गत दहा वर्षांपासून धरणांची रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. मागील पाच वर्षांत क्षेत्राचे आमदार हे पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष असतानाही सदर धरणाच्या सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
सेलू पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांत अनियमितता दिसून येत असून एक ते दोनच कर्मचारी कर्तव्यावर असतात. यामुळे बोर प्रकल्पाबाबतच्या कामांतही अनियमितता आल्याचे दिसून येत आहे़ अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने प्रकल्पच धोक्यात येण्याचे संकेत आहेत़ कर्मचारी ते शासन सर्वच धरणाच्या सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते़(वार्ताहर)