पुस्तक, गणवेशाच्या सक्तीचा पालकांवर बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2015 01:56 IST2015-05-18T01:56:49+5:302015-05-18T01:56:49+5:30

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश प्रक्रिया होत असतानाच गणवेश, पुस्तके व संबंधित शिक्षण साहित्य खरेदी करण्याचा फतवा निघतो.

Book will be compulsory for parents of uniforms | पुस्तक, गणवेशाच्या सक्तीचा पालकांवर बडगा

पुस्तक, गणवेशाच्या सक्तीचा पालकांवर बडगा

श्रेया केने  वर्धा
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश प्रक्रिया होत असतानाच गणवेश, पुस्तके व संबंधित शिक्षण साहित्य खरेदी करण्याचा फतवा निघतो. प्रवेश घेतलेल्या शाळेतूनच सदर साहित्य खरेदी केले जावे याची अप्रत्यक्ष सक्ती पालकांवर होत असल्याचे दिसते. पालकांना नाईलाजास्तव साहित्य खरेदीचा भूर्दंड सहन करावा लागतो. यामुळे शासनाच्या शिक्षण हक्क कायद्याला मुठमाती देण्याचा प्रकार होत असून पालक त्यांच्यावर सक्ती होत असल्याच्या प्रकारापासून अनभिज्ञ असल्याचे वास्तव आहे.
आपल्या मुलाला दर्जेदार शिक्षण द्यावे, जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या सेवाक्षेत्रातील स्पर्धेत आपला मुलगा कुठे मागे पडू नये या अट्टाहासापायी पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घातले जाते. नामांकित शाळेत पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून पालकांकडून भरघोस प्रवेश शुल्क दिले जाते. हीच बाब हेरून पालकांवर गणवेश, पुस्तके व अन्य शैक्षणिक साहित्य हे प्रवेश केलेल्या संस्थेकडून खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. पालकांकडूनही याप्रकारे केलेल्या नियमबाह्य सक्तीचे पालन होताना दिसते. या प्रकारामुळे शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होत असून पालकांकडून तक्रार होत नसल्याने शिक्षण विभागालाही कारवाईत अडसर येत आहे.
प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे यासाठी शासनाने शिक्षण हक्क कायदा अंमलात आणला. यात पाल्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य मोफत देण्यात येते. इंग्रजी माध्यमांच्या संस्था चालकांकडून मात्र पालकांवर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती होत आहे. प्रत्यक्षात ही सक्ती नियमबाह्य असून पालकांना नाहक भूर्दंड सहन करावा लागत आहे. पालकांना याबाबत माहिती नसल्याने शिक्षण विभागाकडे तक्रार करण्याची तसदी घेत नाही.

Web Title: Book will be compulsory for parents of uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.