विहिरीतील तरुणाच्या मृतदेहाने खळबळ

By Admin | Updated: December 30, 2015 02:43 IST2015-12-30T02:43:50+5:302015-12-30T02:43:50+5:30

येथील आष्टी मार्गावरील राऊत यांच्या शेतामधील विहिरीत गावातील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.

The body of a youth from the well | विहिरीतील तरुणाच्या मृतदेहाने खळबळ

विहिरीतील तरुणाच्या मृतदेहाने खळबळ

आत्महत्या वा घसरून पडल्याचा संशय
तळेगाव (श्यामजीपंत) : येथील आष्टी मार्गावरील राऊत यांच्या शेतामधील विहिरीत गावातील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. प्रणव भानुदास खेरडे (१६) असे मृतकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव हा पहाटेच्या सुमारास हातात टॉर्च घेऊन त्याच्या मावशीने मक्त्याने घेतलेल्या शेतात गेला होता. दुपारपर्यंत तो घरी परतला नाही. यामुळे सर्वत्र त्याचा शोधा घेण्यात आला. त्याचा शोध सुरू असताना सकाळी ११ वाजता शेतात जावून पाहिले असता राऊत यांच्या शेतात असलेल्या विहिरीच्या बाहेर त्याचा टॉर्च दिसला व त्याची टोपी पाण्यावर तरंगत होती. पाण्यात गळ टाकून पाहणी केली असता त्याचा मृतदेह आढळून आला. सदर घटना आत्महत्या आहे की तो अंधारात पाय घसरून पडला असावा अशी चर्चा गावात सुरू आहे.
ठाणेदार दिनेश झामरे यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदनवार, पटले, सईकर, करीत ुअसल्याचे सांगण्यात आले.(वार्ताहर)

Web Title: The body of a youth from the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.