शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

अभियंत्याच्या निलंबनासाठी मृतदेह नेला वीज कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 6:00 AM

अभियंता अतकरे, लाईनमन ढोबळे या दोघांनी संगनमत करून शेकडो लोकांना सार्वजनिक खांबावरून वीज चोरण्याची मुभा दिली होती, कारवाई दडपण्याच्या बदल्यात प्रत्येकाकडून पाच हजारांची लाच स्वीकारत होते. मात्र, मृताने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली म्हणून पंधरा हजारांचा दंड ठोठावला होता, असा मृत रामकिसन राठोड यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.

ठळक मुद्देआश्वासनानंतर अंत्यसंस्कार : पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : मोई तांडा येथील शेतकरी रामकिसन सरदार राठोड (४५) यांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याने आकसपूर्ण कारवाई केल्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूस जबाबदार अभियंता अतकर यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी व मृताच्या परिवाराला १५ लाखांची नुकसान भरपाई द्यावी यासाठी गुरुवारी दुपारी मृतदेह उपविभागीय अभियंत्यांच्या कक्षात नेण्यात आला. यावेळी जोरदार खडाजंगी झाली. वरिष्ठांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अभियंता अतकरे, लाईनमन ढोबळे या दोघांनी संगनमत करून शेकडो लोकांना सार्वजनिक खांबावरून वीज चोरण्याची मुभा दिली होती, कारवाई दडपण्याच्या बदल्यात प्रत्येकाकडून पाच हजारांची लाच स्वीकारत होते. मात्र, मृताने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली म्हणून पंधरा हजारांचा दंड ठोठावला होता, असा मृत रामकिसन राठोड यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. विशेष म्हणजे मृताच्या घरून जप्त केलेले साहित्य मीटर, वायर हे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आणलेच नाही. त्यामुळे अभियंता अतकरे मागील चार वर्षांपासून सराईत प्रकारे कार्य करीत आहेत, असेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मृतदेह वीज कंपनीच्या कार्यालयात नेला तेव्हा पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. भाजप गटनेते अशोक विजयकर, शहर अध्यक्ष अ‍ॅड. मनीष ठोंबरे, मोईचे पोलीस पाटील परसराम चव्हाण, उपसरपंच किसन महाराज चव्हाण यांनी उपविभागीय अभियंता आर.एम.खडसे यांच्यासोबत चर्चा केली. आश्वासन मिळाल्यावर मृतदेह बाहेर नेण्यात आला. अभियंता अतकरे दररोज विजेच्या चोरी प्रकरणात पैसे उकळतात, नागरिकांशी असभ्य वर्तन करतात, दररोज मद्य प्राशन करून धमकी देतात, यावर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.यासंदर्भात कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांना माहिती देऊन परिस्थितीबाबत पुराव्यानिशी कागदपत्र पाठविण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कारवाईच्या नावाखाली वेठीस धरणाºया अभियंत्याला तत्काळ निलंबित न केल्यास कार्यालयात धडक देण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ठाणेदार जितेंद्र चांदे, उपविभागीय अभियंता खडसे यांनी प्रकरण शांत केले.