लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : जन्मदिनाच्या दिवशी बाहेरून येतो, असे आईला सांगून घराबाहेर पडलेल्या १६ वर्षीय बालकाचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पियुष गुरूदेव रामगडे (१६) रा. संत तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट असे मृतकाचे नाव आहे.सोमवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास रहिवासी असलेला पियुष हा बाहेरून येतो, असे आईला सांगून घराबाहेर पडला होता. विशेष म्हणजे, पियुषचा सोमवारी वाढदिवस असल्याने आईनेही लवकर ये बाळा असे सांगून त्याला बाहेर जाण्यासाठी परवानगी दिली. परंतु, सूर्य डोक्यावर चढून दुपार होईनही तो घरी न परतल्याने पियुषच्या आईला त्याची चिंता वाटू लागली. त्यामुळे तिने पियुषच्या मामांना याची माहिती दिली. पियुषचे मामा सातपुते हे शिक्षक असून त्यांनीही अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पियुषचे वडील गावात नसल्याने त्याचा नातेवाईकांच्या मदतीने शोध घेण्यात आला. दरम्यान, मंगळवारी सकाळी वणा नदीवरील रेल्वे पुलाजवळ त्याची दुचाकी आढळून आली. बारकाईने पाहणी केली असता डोके व धड वेगवेगळे अशा अवस्थेत पियुषचा मृतदेह रेल्वे रुळाच्या परिसरात आढळला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.नुकताच झाला दहावी उत्तीर्णपियुष हा नुकताच ज्ञानदीप विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाला. तो विज्ञान शाखेचे शिक्षण घेण्यासाठी अकरावीत प्रवेश घेणार होता. पियुषचा मोठा भाऊ बारावीचे शिक्षण घेत असून आई गृहिणी आहे, तर वडील अमरावती येथे नाफेड फेडरेशनमध्ये कार्यरत आहे. ते घटनेच्या एक दिवसापूर्वी कार्यालयीन कामासाठी मुंबई येथे गेले होते. ते आज सकाळी हिंगणघाटला परतल्याचे सांगण्यात येते.
विद्यार्थ्याचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:37 IST
जन्मदिनाच्या दिवशी बाहेरून येतो, असे आईला सांगून घराबाहेर पडलेल्या १६ वर्षीय बालकाचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पियुष गुरूदेव रामगडे (१६) रा. संत तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट असे मृतकाचे नाव आहे.
विद्यार्थ्याचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला
ठळक मुद्देशहरात खळबळ : जन्मदिनी आईशी बोलून पडला घराबाहेर