‘त्या’ बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: December 18, 2015 02:37 IST2015-12-18T02:37:20+5:302015-12-18T02:37:20+5:30
हिंगणी देवनगर येथील दशरथ गाऊत्रे हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेणे सुरू असताना राजेंद्र पोकळे याच्या शेतातील विहिरीत गुरुवारी त्याचा मृतदेह आला.

‘त्या’ बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला
चार दिवसांपासून होता बेपत्ता : पोलिसात तक्रार दाखल
बोरधरण : हिंगणी देवनगर येथील दशरथ गाऊत्रे हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेणे सुरू असताना राजेंद्र पोकळे याच्या शेतातील विहिरीत गुरुवारी त्याचा मृतदेह आला. दशरथ याला त्याचा मित्राने घरून बोलून नेले, तेव्हा पासून तो बेपत्ता असल्याची तक्रार पत्नी सावित्री हिने सेलू पोलिसात दिली. यामुळे सदर प्रकरणाबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुार, दशरथ गाऊत्रे (५५) हा घरी त्याच्या परिवारासोबत जेवण करत असताना त्याचा मित्र नारायण सोनुले (५०) हा घरी आला. त्याने दशरथ याला बाहेर जायचे आहे, असे म्हणून सोबत नेले. ही घटना रविवारी (१३ डिसेंबर) रोजी घडली. त्या दिवसापासून तो बेपत्ता होता. याबाबत दशरथची पत्नी सावित्रिने नारायण याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याच काळात नारायण याने सोमवारी (१४ डिसेंबर) विष प्राशन केले. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
याच काळात दशरथ याचा शोध घेण्यात आला असता त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर सावित्री हिने सेलू पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी नारायण सोनुले यांंची चौकशी केली असता काही उत्तर मिळाले नाही. दरम्यान गुरुवारी दुपारी १ वाजता राजेंद्र पोकळे रा. हिंगणी यांच्या शेतातील विहिरीमध्ये दशरथ याचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. पोलीस पाटील मारूती चचाणे यांनी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार संतोष बाकल यांनी घटनास्थळी येवून विहिरीतून मृतदेह काढून तो शवविच्छेदनसाठी सामान्य रुग्णालयात वर्धा येथे पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहे.(वार्ताहर)