विहिरीत युवकाचा हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 00:23 IST2016-08-27T00:23:28+5:302016-08-27T00:23:28+5:30
येथील अशोक आयतकर यांच्या सोनारी येथील शेतातील विहिरीत एका इसमाचा मृतदेह आढळून आला.

विहिरीत युवकाचा हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह
हत्येचा संशय : डोक्यावर व मानेवर जखमा, तपासाकडे लक्ष
वायगाव (निपाणी) : येथील अशोक आयतकर यांच्या सोनारी येथील शेतातील विहिरीत एका इसमाचा मृतदेह आढळून आला. मृतकाचे हातपाय बांधून असून त्याच्या डोक्यावर व मानेवर जखमा असल्याचे दिसून आले. यामुळे त्याला मारून येथे आणून टाकले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी उघड झाली.
पुरूषोत्तम पांडूरंग मडावी (२२) रा. वायगाव (नि.) असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. आयतकर शेतात गेले असता त्यांना विहिरीत मृतदेह दिसून आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली असून रात्री उशिरापर्यंत मृतदेह काढण्याचे काम सुरू होते. सदर युवकाच्या अंगावर असलेल्या जखमा व बांधलेले हातपाय यामुळे घातपाताची चर्चा आहे. सावंगी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.(वार्ताहर)