इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

By Admin | Updated: June 21, 2015 02:34 IST2015-06-21T02:34:09+5:302015-06-21T02:34:09+5:30

सिंदी (रेल्वे) नजीकच्या परसोडी शिवारात रिलायन्सच्या रेल्वे लाईन लगत अज्ञात इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

The bodies were found in the incidence of the fire | इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

घातपात : घटनास्थळीच जाळल्याचा संशय
केळझर : सिंदी (रेल्वे) नजीकच्या परसोडी शिवारात रिलायन्सच्या रेल्वे लाईन लगत अज्ञात इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
कुणीतरी हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी तेथेच मृतदेह जाळला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस तपासाकडे जनतेचे लक्ष लागले आहेत. परसोडीचे पोलीस पाटील कोपरकर यांनी सिंदी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता ३० ते ३५ वयोगटातील मृतदेह असून १०० टक्के जळालेल्या अवस्थेत होता. मृतदेहाजवळ असलेल्या कुलूपाच्या दोन चाव्या, चिल्लर पैसे व एक पेन पोलिसांनी हस्तगत केला. पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सामान्य रुग्णालय वर्धा येथे पाठविला आहे. घटनेचा तपास सिंदी रेल्वे येथील ठाणेदार मौर्य यांच्या मार्गदर्शनात पीएसआय शाही, जमादार चांदेकर, गजानन काळे, चंद्रकांत मेघरे करीत आहेत.(वार्ताहर)
केवळ पाय शाबूत
परसोडी शिवारात रिलायन्सच्या रेल्वे लाईन लगत अज्ञात इसमाचा पूर्णत: जळालेला मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली. कुणीतरी मारहाण करून जाळल्याच्या स्थितीत सदर मृतदेह आढळून आला. मृतकाचे केवळ पाय शाबूत होते. यावरूनच तो पुरूषाचा मृतदेह असल्याचे ओळखता आले.
मृतदेह संपूर्ण कोळसा झालेला असल्याने ओळख पटविता आली नाही. असे असले तरी सिंदी रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. सामान्य रुग्णालयातून उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतरच पोलिसांना पुढील चौकशी करता येणार आहे.
या घटनेमुळे परसोडीसह सिंदी रेल्वे परिसरात चर्चांना उधान आले असून नेमका प्रकार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The bodies were found in the incidence of the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.