वेगळ्या विदर्भ राज्यासाठी रक्तस्वाक्षरी आंदोलन
By Admin | Updated: May 3, 2017 00:42 IST2017-05-03T00:42:08+5:302017-05-03T00:42:08+5:30
विदर्भ राज्य आघाडी हिंगणघाट-समुद्रपूर तालुका यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वेगळा विदर्भ व्हावा

वेगळ्या विदर्भ राज्यासाठी रक्तस्वाक्षरी आंदोलन
झेंडावंदनावरून पोलीस प्रशासन आणि कार्यकर्त्यांत वाद
हिंगणघाट : विदर्भ राज्य आघाडी हिंगणघाट-समुद्रपूर तालुका यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वेगळा विदर्भ व्हावा याकरिता रक्तस्वाक्षरी आंदोलन करीत विदर्भ राज्याचे झेंडावंदन करण्यात आले. महाराष्ट्र दिनी झालेल्या या कार्यक्रमाला सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला.
सकाळपासून सुरू झालेल्या या अभियानात वाढत असलेली गर्दी पाहून पोलीस प्रशासनसुद्धा दंगल विरोधी पथकासह दाखल झाले. पोलीस प्रशासनाने राष्ट्रध्वजाशिवाय इतर कोणताही झेंडा या ठिकाणी फडकविता येणार नाही, अशी भूमिका घेतली. यावर विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्ते व पोलिसांत शाब्दीक चकमक उडाली. याप्रसंगी आंदोलनाची रूपरेषा समजावून सांगताच पोलिसांकडून सहमती मिळाली.
रक्तस्वाक्षरी आंदोलनाचे निवेदन घेऊन शिष्टमंडळ व विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्ते घोषणा देत पायीच उपविभागीय कार्यालयाकडे निघाले. उपविभागीय कार्यालयासमोर अनिल जवादे, मधुसूदन हरणे, गोकुल पाटील, अशोक सोरटे, मंगला ठक यांनी जनतेला रक्तस्वाक्षरी आंदोलनाची रूपरेषा समजावून सांगितली. यानंतर शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले. ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पाठविण्याची ग्वाही याप्रसंगी देण्यात आली.
या आंदोलनात प्रा. भारत पाटील, सीताराम भुते, गोकुल पाटील, रामू सोगे, दिनेश वाघ, मंगला ठक, सुनीता भितघरे, महेश माकडे, गोपाल मांडवकर, जयंता धोटे, समीर शेख, मनोज डबले, नारायण तुपट, हेमंत धोटे, राजेंद्र भोयर, विक्की भितघरे, अजय मुळे, शकील अहमद, प्रवीण हटवार, मंगेश भुते, राकेश जवादे, प्रवीण वासेकर, बंटी रघाटाटे, रहमत खान पठाण, विशाल वरघणे, अशोक मोरे, श्रीकांत वागदे, सुमित महाजन, जर्नाधन तुमाणे, राहुल चंदनखेडे, राहुल गिरडे, नितेश कोहारे, प्रशांत भोयर, निसार शेख, रमेश शेंडे, विजय नानोटकर, महेंद घुले, दिलीप पाटील, सचिन रूईकर, प्रमोद चौधरी, संजय ढोबळे, राहुल दारूणकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)