बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

By Admin | Updated: July 2, 2016 02:17 IST2016-07-02T02:17:54+5:302016-07-02T02:17:54+5:30

लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे शनिवारी आयोजन करण्यात आले आहे़.

Blood Donation Camp today on the occasion of Babuji's birth anniversary | बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

सामान्य रुग्णालयाची चमू करणार रक्त संकलन
वर्धा : लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे शनिवारी आयोजन करण्यात आले आहे़. लोकमत आणि युवा सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर सकाळी १० ते दुपारी १ वाजतापर्यंत न्यू आटर््स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज येथे घेण्यात येणार आहे़ या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमूकडून रक्त संकलन करण्यात येणार आहे.
निरंतर, निष्काम कर्म आणि सेवा कार्याची प्रेरणा देणारे आदर्श व्यक्तिमव ‘बाबूजी’ यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत ‘लोकमत’च्यावतीने वर्षभर सेवाभावनेतून अनेक उपक्रम राबविले जातात़ याचाच एक भाग म्हणून जनहितासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे़
गंभीर आजाराच्या रुग्णाला किंवा अपघातात जखमी झालेल्यांना रक्ताची नितांत आवश्यकता असते़ रक्तदात्याकडून मिळालेले रक्तच त्यांचे जीवन वाचवू शकते, म्हणूनच रक्तदान सर्वदानात श्रेष्ठ आहे़
एक सामाजिक जाणीव म्हणून या पवित्र कार्यात जास्तीत जास्त संख्येत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे़ विशेषत: लोकमतचे वाचक, लोकमत सखी मंच, युवा नेक्स्टच्या सदस्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी करावे़ अधिक माहितीसाठी वर्धा लोकमत कार्यालय किंवा ९७६७७०४१२५, ७७०९९५५९७५, ९३७०८४३६३२ या क्रमांकावर संपर्क साधावा़, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.(उपक्रम प्रतिनिधी)

Web Title: Blood Donation Camp today on the occasion of Babuji's birth anniversary