बाबूजींच्या जयंतीदिनी युवकांचे रक्तदान
By Admin | Updated: July 3, 2015 02:28 IST2015-07-03T02:28:05+5:302015-07-03T02:28:05+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त वर्धेत ...

बाबूजींच्या जयंतीदिनी युवकांचे रक्तदान
वर्धा: लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त वर्धेत गुरुवारी यशवंत विद्यालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात स्वच्छेने ४५ जणांनी रक्तदान केले.
लोकमत वृत्तपत्र समूह आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने व युवा सोशल फोरमच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आले.