रक्तदान व वृक्षारोपणाने आज बाबूजींना आदरांजली

By Admin | Updated: July 2, 2017 00:43 IST2017-07-02T00:43:03+5:302017-07-02T00:43:03+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त

Blood donation and plantation honors Babuji today | रक्तदान व वृक्षारोपणाने आज बाबूजींना आदरांजली

रक्तदान व वृक्षारोपणाने आज बाबूजींना आदरांजली

लोकमत व युवा सोशल फोरमचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी वर्धेत रक्तदान शिबिरासह वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत जिल्हा कार्यालय आणि युवा सोशल फोरमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचा प्रारंभ जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी अतिथी म्हणून सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांच्यासह युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ उपस्थित राहणार आहेत. स्व. बाबूजींना आदरांजली अर्पण करून रक्तदान शिबिराला प्रारंभ होईल. या संदर्भात अधिक माहितीसाठी किशोर मानकर ९६५७८८७११२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

हनुमान टेकडीवर वृक्षारोपण
जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिर पार पडल्यानंतर हनुमान टेकडी परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्षारोपण कार्यक्रम वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सहकार्याने पार पडणार आहे.

 

Web Title: Blood donation and plantation honors Babuji today