वायगावातून बीएलओ बेपत्ता
By Admin | Updated: June 19, 2015 00:20 IST2015-06-19T00:20:54+5:302015-06-19T00:20:54+5:30
मतदान कार्डाशी आधार कार्ड जोडण्याची मोहीम राबविण्याचे आदेश आहे. यानुसार कारवाई सुरू आहे; ....

वायगावातून बीएलओ बेपत्ता
वायगाव (निपाणी) : मतदान कार्डाशी आधार कार्ड जोडण्याची मोहीम राबविण्याचे आदेश आहे. यानुसार कारवाई सुरू आहे; मात्र वायगाव(निपाणी) येथील वॉर्ड क्रमांक ३ व ४ मध्ये बीएलओ बेपत्ता असल्याने नागरिकांना योजनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याकडे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपले मतदान ओळखपत्र आधारकार्डशी लिंक-अप करण्याचे आदेश आहेत. यात नागरिकांनी मतदार ओळखपत्राची झेरॉक्स, आधारकार्डची झेरॉक्स, दूरध्वनीक्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांकासह गावात नेमलेल्या बी.एल.ओ.कडे शक्य तितक्या लवकर जमा करण्याचे आदेशात नमूद आहे. मात्र वायगाव (नि.) येथील वॉर्ड क्र. ३, ४ साठी बीएलओ कोण याची माहिती गावकऱ्यांना नाही. संबंधित तलाठी व अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तरे देण्यात येत आहे. येथील प्राथमिक शाळेतील शिक्षिकाकडे बीएलओची नेमणूक केली असल्याचे बोलले जाते. त्या शिक्षिकांना जात विचारणा केली असता माझ्याकडे ते नाही, असे उत्तर दिल्या जात आहे. यामुळे आधारकार्ड मतदान कार्ड लिंक-अप करण्यासाठी कोणाकडे द्यावे, या संभ्रमात नागरिक आहे.
नागरिकांचे आधार कार्ड व मतदान कार्ड लिंगअप न झाल्यास येत्या निवडणुकीत मतदनाच्या हक्क राहणार नाही. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लक्ष दत त्वरित बीएलओ नसेल तर त्याची नेमणूक करून नागरिकांना मतदान ओळखपत्र व आधारकार्ड लिंक -अप करण्यासाठी झेरॉक्स जमा करण्यासाठी कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी गावात जोर धरत आहे.(वार्ताहर)