आगीत फळाचे दुकान खाक
By Admin | Updated: September 30, 2016 02:21 IST2016-09-30T02:21:47+5:302016-09-30T02:21:47+5:30
इतवारा बाजारातील मेहर फ्रुट कंपनीला अचानक आग लागली. सदर आग कशाने लागली हे जरी अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आगीत प्लास्टिकच्या ८०५ कॅरेटसह

आगीत फळाचे दुकान खाक
इतवारा बाजारातील घटना : प्लास्टिकच्या कॅरेटसह साहित्याचा कोळसा
वर्धा : इतवारा बाजारातील मेहर फ्रुट कंपनीला अचानक आग लागली. सदर आग कशाने लागली हे जरी अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आगीत प्लास्टिकच्या ८०५ कॅरेटसह इतर साहित्य जळून खाक झाले. यात फळ व्यावसायिक रवींद्र चावरे यांचे मोठे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सकाळी उघड झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, इतवारा परिसरातील काही नागरिकांना मेहर फ्रुट कंपनीच्या इमारतीतून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी सदर घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना देत शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी पोहोचले. तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
या आगीत प्लास्टिकचे ६३० छोटे कॅरेट, प्लास्टीकचे १७५ मोठे कॅरेट, हातगाडी, खुर्च्या, कुलर, सोयाबीनचे पोते आदि साहित्य जळून खाक झाल्याने जवळपास ४ लाखांचे नुकसान झाल्याचे व्यावसायिक रवींद्र चावरे यांनी सांगितले. घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)