वर्धा जिल्ह्यातील देवळीच्या महालक्ष्मी कंपनीत ब्लास्ट; दोन कामगार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 20:20 IST2021-09-29T20:19:38+5:302021-09-29T20:20:03+5:30

Wardha News देवळी येथील औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी स्टील कारखान्यातील तीन नंबरच्या भट्टीत ब्लास्ट होऊन दोन कामगार गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Blast at Mahalakshmi Company, Deoli, Wardha District; Two workers serious | वर्धा जिल्ह्यातील देवळीच्या महालक्ष्मी कंपनीत ब्लास्ट; दोन कामगार गंभीर

वर्धा जिल्ह्यातील देवळीच्या महालक्ष्मी कंपनीत ब्लास्ट; दोन कामगार गंभीर

वर्धा :  देवळी येथील औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी स्टील कारखान्यातील तीन नंबरच्या भट्टीत ब्लास्ट होऊन दोन कामगार गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बुधवारी सकाळ पाळी सुरू झाल्यानंतर स्टील कंपनीच्या तीन नंबरच्या भट्टीत अचानक ब्लास्ट झाला. भट्टीतील लोखंडाचा तप्त रस बाहेर फेकला गेल्याने कामगार नरेंद्र सत्यदेव सिंग व अजयकुमार यादव हे गंभीर जखमी झाले. जखमी अजयकुमार यादव यांना नागपूर येथील, तर नरेंद्र सत्यदेव सिंग यांना सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद देवळी पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Blast at Mahalakshmi Company, Deoli, Wardha District; Two workers serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Blastस्फोट