काळविटाची शिकार करणारी टोळी गजाआड

By Admin | Updated: April 21, 2016 02:46 IST2016-04-21T02:46:23+5:302016-04-21T02:46:23+5:30

जिल्ह्यात काळविटांची शिकार करून विकणारी टोळी असल्याची माहिती पोलिसांना होती. बुधवारी याबाबत ठोस माहिती ...

Blackwish hunting gang | काळविटाची शिकार करणारी टोळी गजाआड

काळविटाची शिकार करणारी टोळी गजाआड

शिंदेनगरातील घटना : घराच्या अंगणात सुरू होती मांसाची विक्री
यवतमाळ : जिल्ह्यात काळविटांची शिकार करून विकणारी टोळी असल्याची माहिती पोलिसांना होती. बुधवारी याबाबत ठोस माहिती मिळाल्यानंतर एलसीबी पथकाने शिंदे नगरात धाड टाकून आरोपीला अटक केली. तसेच त्याच्याकडून मृत काळविट आणि दुचाकीही जप्त करण्यात आली.
सैयद युनुस सैयद युसुफ, सैय अयुब सैयद युनुस तसेच सैयद अयुब याची पत्नी रा. सर्व शिंदेनगर यवतमाळ अशी यातील आरोपींची नावे आहेत. यातील सैयद अयुब हा आरोपी फरार आहे तर इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सैयद अयुब याच्या घरी अंगणात काळविट कापून त्याची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता काळविटाचे मांस विकताना आरोपी रंगेहाथ सापडले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजू भसानी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कडू, पोलीस उपनिरीक्षक वाटाणे, एएसआय विजय डबले, ऋषी ठाकूर, संजय दुबे, गजानन डोंगरे, विशाल भगत, हरिष राऊत, किरण पडघन व चालक सतीश गजभिये यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Blackwish hunting gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.