पिपरी राखण्यात भाजपला यश
By Admin | Updated: November 24, 2014 23:02 IST2014-11-24T23:02:22+5:302014-11-24T23:02:22+5:30
जिल्हा परिषदेच्या पिपरी (मेघे) गटाकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडे असलेली ही जागा राखण्यात त्यांना यश आले. या पोटनिवडणुकीत भाजपचे अविनाश देव यांनी विजय मिळविला.

पिपरी राखण्यात भाजपला यश
जि.प.साठी पोटनिवडणूक : अविनाश देव विजयी
वर्धा : जिल्हा परिषदेच्या पिपरी (मेघे) गटाकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडे असलेली ही जागा राखण्यात त्यांना यश आले. या पोटनिवडणुकीत भाजपचे अविनाश देव यांनी विजय मिळविला.
पिपरी (मेघे) येथील जिल्हा परिषदेचे सदस्य श्याम गायकवाड यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या एका जागेकरिता निवडणूक होती. यात रविवार दि. २३ ला मतदान झाले. यावेळी सरासरी ३५ टक्केच मतदान झाले. मतमोजणी सोमवार दि. २४ ला झाली. यात भाजपचे अविनाश देव ७१३ मतांनी विजयी झाले. त्यांना एकूण ३ हजार ८३० मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना २ हजार १४५ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार अमित गावंडे २ हजार ११९ मते घेवून तिसऱ्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद दांदडे १ हजार ५८ मते घेत चवथ्या क्रमांकावर राहिले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्यावतीने पिपरी येथे विजयी मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)