जेएनयु विरोधात भाजपाचा निषेध मोर्चा

By Admin | Updated: February 23, 2016 02:31 IST2016-02-23T02:31:25+5:302016-02-23T02:31:25+5:30

भारतीय जनता पार्टीच्या वतीने जेएनयुच्या देशद्रोही घटनेविरोधात सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात

BJP's Prohibition Against JNU | जेएनयु विरोधात भाजपाचा निषेध मोर्चा

जेएनयु विरोधात भाजपाचा निषेध मोर्चा

वर्धा : भारतीय जनता पार्टीच्या वतीने जेएनयुच्या देशद्रोही घटनेविरोधात सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी खा. रामदास तडस यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. येथून निघालेल्या मोर्चाने या प्रकरणचा निषेध नोंदविण्यात येत असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
या मोर्चात भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, आ. डॉ. पंकज भोयर, माजी खासदार विजय मुळे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. मोठ्या संख्येत भाजपा कार्यकर्ते निषेध नोंदवीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या प्रसंगी युवामोर्चा माजी अध्यक्ष विरु पांडे, जि. प. सदस्य वसंत आंबटकर, जि. प. सभापती चेतना मानमोडे, सेलू पं.स. सभापती मंजुशा दुधबडे, वर्धा जिल्हा महासचिव सुनील गफाट, राहुल चोपडा, बाळा जगताप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मंत्री विमलेखकुमार पांडे, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा महासचिव संजय बडगिलवार, वर्धा शहर भाजपा अध्यक्ष प्रशांत बुरले, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, प्रणव जोशी, पुलगाव शहर अध्यक्ष मंगेश झाडे, नगर परिषद उपाध्यक्ष कमल कुलधरिया, न.प.सभापती स्नेहलता जैन, माया उमाटे, श्रीधर देशमुख, ग्रामीणचे अध्यक्ष संजय डेहणे, सिंदी रेल्वे शहर अध्यक्ष सुधाकर घवघवे, हिंगणघाट शहर अध्यक्ष सुभाष कुंटेवार, देवळी शहर अध्यक्ष किरण तेलरांधे, देवळी ग्रामीण अध्यक्ष दीपक फुलकरी, आर्वी शहर अध्यक्ष विनय डोळे, आर्वी ग्रामीण अध्यक्ष मिलिंंद हिवाळे, पुलगाव शहर अध्यक्ष मंगेश झाडे, आष्टी ग्रामीण अध्यक्ष कमलाकर निंभेरकर, कारंजा(घा.) ग्रामीण अध्यक्ष मुकुंद बारंगे, दिलीप ढोक, सचिन गहलोत, प्रशांत इंगळे, रमेश वाळके, माधव कोटस्थाने, गुडू कावळे, रमेश खंगार, प्रमोद ढोक, किशोर गव्हाळकर, अजय वरटकर, निलेश किटे तसेच भाजपा पुरुष व महिला कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा झाली. या सभेत खा. तडस व आ. भोयर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निषेध नोंदविला.(प्रतिनिधी)

Web Title: BJP's Prohibition Against JNU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.