भाजपाची जयस्वाल गटाला अध्यक्षपदाची आॅफर ?

By Admin | Updated: November 29, 2015 02:52 IST2015-11-29T02:52:37+5:302015-11-29T02:52:37+5:30

येथील नगरपंचायत निवडणुकीत कुणाहीकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे काँग्रेस (जयस्वाल गट), भाजपा व दप्तरी गट ...

BJP's Jaiswal will be elected president? | भाजपाची जयस्वाल गटाला अध्यक्षपदाची आॅफर ?

भाजपाची जयस्वाल गटाला अध्यक्षपदाची आॅफर ?

सेलू नगर पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक : सेलूच्या पहिल्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीला राजकीय ‘ग्लॅमर’
प्रफुल्ल लुंगे सेलू
येथील नगरपंचायत निवडणुकीत कुणाहीकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे काँग्रेस (जयस्वाल गट), भाजपा व दप्तरी गट यापैकी कोणतेही दोन गट एकत्र आल्याशिवाय नगर पंचायतीचा अध्यक्ष होवू शकत नाही. हे वास्तव आहे. अध्यक्षपदाचे नामांकन परत घेण्याचा शेवटचा दिवस शुक्रवार होता. तीनपैकी एकाही गटाने नामांकन परत घेतले नाही. यामुळे दप्तरी-जयस्वाल गटाच्या हातमिळविणी प्रश्नांकित आहे. अशातच भाजपाने जयस्वाल गटाला थेट अध्यक्षपदांची आॅफर दिल्याची चर्चा रंगत आहे. यामुळे खुर्चीच्या मोहापोटी दप्तरी-जयस्वाल गटाची झालेली युती विस्कटीत होत काँग्रेस-भाजपा अशी ‘अभद्र युती’, तर होणार नाही ना, असा वावळ्या उठू लागल्या आहे. या नव्या समीकरणाच्या गणितामुळे मतदार व कार्यकर्ते मात्र बुचकाळ्यात पडले आहेत. वेगाने होणाऱ्या या घडमोडींमुळे सेलूच्या पहिल्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीला चांगलेच ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले आहे.
काँग्रेस (जयस्वाल गट) ५, दप्तरी गट ६, भाजपा- ३, अपक्ष-२ व बसपा-१ असे १७ सदस्य मतदारांनी निवडून दिले. यात कुणालाही एकहाती सत्ता मिळाली नाही. त्यामुळे कोणत्याही दोन गटाच्या युतीशिवाय सत्तेचे द्वार उघडणे शक्य नाही. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या ३० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, दप्तरी गटाची व जयस्वाल गटाचे प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल यांच्यात सामंजस्यपूर्ण चर्चा झाली. दप्तरी गटाला पहिल्या अध्यक्षपदाचा मान देत उपाध्यक्ष पद जयस्वाल गटाने आपल्या वाट्याला घेतले. त्यानुसार शुक्रवारी जयस्वाल गटाकडून असलेले अध्यक्षपदाचे डॉ. राजेश जयस्वाल यांचे नामांकन परत घेणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. नामांकन परत घेण्याची वेळ निघून गेल्यानंतर ही गट्टी झाल्याचे सांगितले जात आहे.
तत्पूर्वी भाजपाने डॉ. राजेश जयस्वाल यांना थेट अध्यक्षपदाची आॅफर दिली. त्यामुळे जयस्वाल यांनी नामांकन परत घेतले नसल्याची चर्चा आहे. त्याचरात्री या विषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. यामुळे दप्तरी गटाशी जयस्वाल गटाने केलेली हातमिळविणी विस्कटण्याचे संकेत मिळू लागले आहे. आता विजय जयस्वाल यांनी दप्तरींना दिलेला शब्द पाळल्या जातो की डॉ. राजेश जयस्वाल सख्ख्या भावाचा शब्द मोडून अध्यक्षाची खुर्ची मिळवितात, ही चर्चा सेलूकरांमध्ये चांगलीच रंगत आहे.

नवे अध्यक्ष दफ्तरी की जयस्वाल?
ऐनवेळेवर सत्तेसाठी काहीही होवू शकते. हे नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे. भाजपाचे न.पं.तील नवनियुक्त प्रमुख सदस्य चुडामन हांडे हे जयस्वाल गटाचे कट्टर विरोधक मानले जाते. तसेच हांडे हे दप्तरी गटाचेही खाजगी व राजकीय विरोधक आहे. दप्तरीगटाला भाजपाच्या वरिष्ठांनी दबावात घेवून स्वगृही परतून न.पं.वर सत्ता काबीज करण्याबाबत गळ घातली. मात्र चुडामन हांडे यांना कोणतेच पद न.पं. त दिल्या जात नसेल, तर भाजपाशी हात मिळविणी करतो, असे दप्तरी यांनी भाजपाच्या नेत्यांना सांगितले. मात्र भाजपाच्या तीन सदस्यांपैकी दोन सदस्य भाजपाच्या नव्हे, तर हांडे यांनी स्वत:च्या भरवशावर निवडून आणले हे साऱ्यांना ठाऊक आहे. मग हांडे यांना डावलणे भाजपा नेत्यांना शक्य नव्हते. हे समीकरण विस्कटल्यावर जयस्वाल गटाशी दप्तरी गटाने हातमिळवणी केली व दप्तरी गटाचा अध्यक्ष व जयस्वाल गटाचा उपाध्यक्ष, असे सूत्र निश्चित झाले. मात्र भाजपाला दप्तरी यांचा राजकीय काटा काढायचा असल्याने जयस्वाल यांच्याशी असलेले कडवे वैरत्व विसरत थेट राजेश जयस्वाल यांना अध्यक्षपदाची आॅफर दिल्याची आतील गोटातील माहिती आहे.
आता जयस्वाल गट दप्तरी यांना दिलेला शब्द पाळतो की काँग्रेस-भाजपा अशी अभद्र युती करीत सत्तेत सहभागी होतो. हे सोमवारी निवडणूक निकालातूनच कळणार आहे.

Web Title: BJP's Jaiswal will be elected president?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.