इंझाळा जि.प.गटात भाजपाचा झेंडा
By Admin | Updated: July 1, 2014 01:38 IST2014-07-01T01:38:50+5:302014-07-01T01:38:50+5:30
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या इंझाळा जि.प. गटात भाजपाचे किशोर मडावी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तानबा उईके यांच्यावर मात करून विजय संपादीत केला. भाजपाचे मडावी यांनी

इंझाळा जि.प.गटात भाजपाचा झेंडा
काँग्रेसला हादरा : ७७७ मतांनी विजय
देवळी:संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या इंझाळा जि.प. गटात भाजपाचे किशोर मडावी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तानबा उईके यांच्यावर मात करून विजय संपादीत केला. भाजपाचे मडावी यांनी चार हजार सहा मते घेवून ७७७ मतांचे मताधिक्य मिळविले. या निवडणुकीचे विशेष म्हणून १८२ मतदारांनी नोटाचा वापर केला.
आगामी जि.प. अध्यक्षाच्या निवडीसाठी काँग्रेस व भाजपाच्या संख्याबळाची समसमान स्थिती लक्षात घेता या निवडणुकीचे महत्त्व होते. यासाठी भाजपाचे नवनिर्वाचित खासदार रामदास तडस यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करून प्रचारयंत्रणा राबिवीली होती. आजपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जि.प.गटात भाजपाच्या यशामुळे काँग्रेसचे नामदार रणजीत कांबळे यांच्या गटाला जबरदस्त हादरा बसला आहे. येत्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणून सुद्धा या निवडणुकीकडे पाहिले जात असल्याची चर्चा तालुक्यात होती. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या गटाचे जि.प.सदस्य विष्णू ताडाम यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.(प्रतिनिधी)