शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात राजकीय खळबळ, भाजप जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 12:47 IST

भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून गोडे भाजपच्या कार्यप्रणालीवरून अस्वस्थ होते.

वर्धा : वर्ध्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिरीष गोडे यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महत्वाचे म्हणजे जिल्हाध्यक्ष पदावर असताना त्यांनी भाजपला हा धक्का दिला.

वर्ध्याचे भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून गोडे भाजपच्या कार्यप्रणालीवरून अस्वस्थ होते. भाजपची शेतकरी विरोधी भूमिका आणि वाढती महागाई यावरून त्यांनी  काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे नाराजीही व्यक्त केली होती. अखेर आज सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांच्या उपस्थितीत त्यांनी करंजी (भोगे ) येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी एचके पाटील, पालकमंत्री सुनिल केदार, चारुलता टोकस, शेखर शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजपची शेतकरी विरोधी भूमिका आणि वाढती महागाई यावरून त्यांनी घुसमट होत असल्याची भावना व्यक्त केली होती. अखेर आज त्यांनी राजीनामा दिलाच. गोडे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील काँग्रेसचं बळ वाढलं आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस