देवळीत आता भाजपचाच आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:41 IST2019-07-14T23:41:01+5:302019-07-14T23:41:41+5:30

या विधानसभा मतदार संघाचा पुढचा आमदार भाजपाचाच असला पाहिजे. यावर जोर देऊन ज्यालाही पक्षाची उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली जाईल. तसेच चारही मतदार संघात भाजपालाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी अपेक्षाही खासदास रामदास तडस यांनी व्यक्त केले.

The BJP MLA now in Deoli | देवळीत आता भाजपचाच आमदार

देवळीत आता भाजपचाच आमदार

ठळक मुद्देरामदास तडस : सरपंच मेळाव्याला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : या विधानसभा मतदार संघाचा पुढचा आमदार भाजपाचाच असला पाहिजे. यावर जोर देऊन ज्यालाही पक्षाची उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली जाईल. तसेच चारही मतदार संघात भाजपालाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी अपेक्षाही खासदास रामदास तडस यांनी व्यक्त केले. देवळीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी खा.तडस यांच्या नागरी सत्कारासह सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रामदास आंबटकर तर प्रमुख अतिथी म्हणून अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार समीर कुणावार, आमदार अनिल सोले, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जि.प.अध्यक्ष नितीन मडावी, माजी खा. विजय मुडे, सुरेश वाघमारे यांची उपस्थिती होती. आता पालकमंत्री नसलो तरी अर्थमंत्री म्हणून विकास विशेष लक्ष देणार आहे, अशी ग्वाही देऊन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सामान्य माणसाची सेवा करण्यासाठी आपल्याला निवडून दिले आहे. याचे भान ठेवून लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद अबाधित ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पावसाअभावी तसेच वन्यप्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे शेतकऱ्यांची होत असलेली दैनावस्था सांगून शासनस्तरावर शेतमालाच्या हमी भावाविषयी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. प्रास्ताविक प. स. उपसभापती किशोर गव्हाळकर यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन राहुल चोपडा यांनी केले. यावेळी प्रकाश केळकर, भुपेंद्र शहाणे, प्रशांत इंगळे तिगावकर, मिलींद भेंडे, जि.प.सभापती जयश्री गफाट, निता गजाम,जि.प.उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, प.स.सभापती विद्या भुजाडे, पुलगावच्या नगराध्यक्षा शितल गाते, जि.प.सदस्य राणा रणनवरे, वैशाली येरावार, अतुल तराळे, जयंत येरावार, विठ्ठलराव बोरकर, गुंड्डू कावळे यांची उपस्थिती होती.

Web Title: The BJP MLA now in Deoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.