शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेघेंचा अट्टाहास ठरू शकतो भाजपसाठी अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 14:41 IST

वर्धा- विद्यमान स्थितीत भारतीय जनता पक्षाचा खासदार विराजमान असताना त्यांची उमेदवारी कापून आपल्या मुलाला उमेदवारी द्या, असा आग्रह माजी मंत्री व भाजपचे नेते दत्ता मेघे यांनी धरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा- विद्यमान स्थितीत भारतीय जनता पक्षाचा खासदार विराजमान असताना त्यांची उमेदवारी कापून आपल्या मुलाला उमेदवारी द्या, असा आग्रह माजी मंत्री व भाजपचे नेते दत्ता मेघे यांनी धरला आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पायघड्या घालणे सुरू आहे. सुपुत्र सागर मेघे निवडणूक लढण्यास तयार नसल्याचे वेळोवेळी सांगत असले तरी त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी दत्ता मेघे समर्थक असलेले वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर व माजी खासदार सुरेश वाघमारे यांना पाठवून त्यांची मनधरणी चालविली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार रामदास तडस समर्थक आक्रमक झाले असून मेघे यांचा तडस विरोध हा केवळ पुत्र प्रेमापोटी असल्याचे जाहीररित्या बोलत आहे. भारतीय जनता पक्षाने मेघे यांना भरभरून दिले आहे. मेघे यांचे सुपुत्र समीर मेघे हिंगणा येथून आमदार आहेत. पंकज भोयर यांची उमेदवारी मेघेंमुळेच देण्यात आली. रविवारी मेघेंनी आयोजित केलेल्या बैठकीत केवळ त्यांचे समर्थक व त्यातही वर्धा मतदार संघातीलच लोकं उपस्थित होते. भाजपचा कुणीही महामंत्री व पदाधिकारी उपस्थित नव्हते. यापूर्वी मेघे व तडस यांच्या वादाला जातीचा रंग देण्यात आला. हा रंगच संपूर्ण विदर्भात भाजपला दणका देणारा ठरू शकतो. रामदास तडस हे राष्ट्रीय तैलीक महासभेचे अध्यक्ष आहे. तसेच विदर्भाच्या किमान सहा मतदार संघात तेली समाजाचे मतदान निर्णायक आहे. भाजपच्या संपूर्ण खासदारात तडस एकमेव तेली खासदार आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी कापून मेघे यांचा अट्टाहास पूर्ण केला गेल्यास वर्धा मतदार संघासह भाजपला चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोदिंया, यवतमाळ या मतदार संघातही तडाखा बसू शकतो. त्यामुळे भाजप या प्रश्नावर काय भूमिका घेते हे महत्वाचे राहणार आहे.

पंकज भोयर यांची अडचण वाढणारडॉ. पंकज भोयर हे वर्धा मतदार संघातून गेल्यावेळी निवडून आले होते. आता तडस यांची उमेदवारी कापून सागर मेघे यांना उमेदवारी द्या याबाबत मोठा पुढाकार घेतला आहे. भोयर यांच्या मतदार संघात सेलू तालुक्यात तेली समाजाचे मोठे प्राबल्य आहे. याभागात भोयर यांचे या भूमिकेमुळे प्रचंड असंतोष असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत मतदार भोयर यांचा हिशोब लावण्याच्या तयारीत आहे.

टॅग्स :Datta Megheदत्ता मेघे