शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:04 IST

न. प. निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाने पुलगाववासीयांना शहर विकासाची ग्वाही दिली होती. शहर विकासाचा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन गत वर्षभऱ्यात शहरात विविध कामे करण्यात आली आहेत. पुलगाव शहराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी दिली.

ठळक मुद्देराजेश बकाने : पत्र परिषदेतून दिली वर्षभºयाच्या कामाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : न. प. निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाने पुलगाववासीयांना शहर विकासाची ग्वाही दिली होती. शहर विकासाचा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन गत वर्षभऱ्यात शहरात विविध कामे करण्यात आली आहेत. पुलगाव शहराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी दिली. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.पुलगाव नगर पालिकेवर भाजपाची सत्ता आल्यापासून शहरवासीयांना मुलभूत सोई-सूविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ते न.प. प्रशासनाचे कर्तव्यही आहे. अल्पसंख्याक बहुल क्षेत्र, दलित वस्तीसुधार योजना, सृजल पाणी पुरवठा योजना, सार्वजनिक आरोग्य आदी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील फडणवीस सरकार कोट्यावधींचा निधी देत आहे. नुकतेच स्थानिक न.प. ला वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदानापोटी १० कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे.भाजपाने नागरिकांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पुलगाव शहराच्या विकासासाठी प्रयत्नही होत आहेत. अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकासांतर्गत वॉर्ड क्रं. १ मध्ये बोहरा समाज कब्रस्थानमध्ये १२ लाख ४३ हजार रूपये खर्चाचे सभागृह तसेच रस्ते, दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत वॉर्ड क्रं. १५ मध्ये १९ लाख ६३ हजार खर्चाचे मोठ्या नाल्यांचे बांधकाम, आठवडी बाजराच्या बांधकामासाठी ९६.८१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत वॉर्ड क्रं.१३ मध्ये ४३.११ लाख रूपये खर्चाचे मोठ्या नाल्यांच्या बांधकाम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष शितल गाते, न.प. उपाध्यक्ष आशिष गांधी, गट नेता राजीव जयस्वाल, संजय गाते, नितीन बडगे, मंगेश झाडे, राजीव बत्रा, नगरसेवक गौरव दांडेकर, भगवान भेंडारकर, जयभारत कांबळे, माधुरी इंगळे आदी उपस्थित होते.