शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवकाच्या घरातील वाहने पेटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 22:47 IST

येथील भाजपाचे स्वीकृत नगरसेवक दादा उर्फ दिनेश सुधाकर देशकरी यांच्या घरासमोर उभी असलेली वाहने अज्ञात व्यक्तीने पेटविली. ही घटना स्थानिक संत तुकडोजी वॉर्डात मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देतुकडोजी वॉर्डातील घटना : अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील भाजपाचे स्वीकृत नगरसेवक दादा उर्फ दिनेश सुधाकर देशकरी यांच्या घरासमोर उभी असलेली वाहने अज्ञात व्यक्तीने पेटविली. ही घटना स्थानिक संत तुकडोजी वॉर्डात मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सदर प्रकरणी तक्रारीवरून हिंगणघाट पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, नगरसेवक देशकरी यांच्या मालकीची एम. एच. ३२ एक्स. ६९९३ आणि एम. एच. ३२ ए. डी. ४१४१ क्रमांकाची दुचाकी त्यांच्या घराच्या आवारात उभी होती. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या आवारात प्रवेश करून सदर दोन्ही वाहनांना आग लावली. दरम्यान पायऱ्यांवरून कुणीतरी धावत असल्याचे भासल्याने दिनेश देशकरी यांच्या पत्नीने आरडा-ओरड केली. त्यामुळे घरातील इतर सदस्यही जागे झाले. दोन्ही वाहने पेटत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत दोन्ही दुचाकी जळाल्याने दिनेश देशकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. आग लावणारे दोघे होते. त्यांनी नंदोरी चौकाकडे पळ काढला, अशी चर्चा परिसरात होती. माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :fireआगBJPभाजपा