वर्धा जिल्ह्यात भाजप आमदाराकडून वाढदिवशी धान्यवाटप; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 01:40 PM2020-04-06T13:40:35+5:302020-04-06T14:12:44+5:30

जिल्ह्यातील आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी रविवारी आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केले. दरम्यान, अलोट गर्दी झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

Birthday cerebration from BJP MLA in Wardha district; rules failed | वर्धा जिल्ह्यात भाजप आमदाराकडून वाढदिवशी धान्यवाटप; गुन्हा दाखल

वर्धा जिल्ह्यात भाजप आमदाराकडून वाढदिवशी धान्यवाटप; गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देधान्य घ्यायला तुफान गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी रविवारी आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केले. दरम्यान, अलोट गर्दी झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन शासन-प्रशासनाकडून करण्यात येत असताना हा प्रकार समोर आला आहे.  दादाराव केचे यांच्याविरुद्ध आर्वी पोलीस ठाण्यातआपत्ती व्यवस्थापन   कायदा 2005  52/53 अन्वये कलम १८८,269,270  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाढदिवसानिमित्ताने गोरगरिबांना धान्य वाटप करण्याचे आमदार केचे यांनी जाहीर केले होते. त्यासाठी शनिवारी वॉडावॉर्डांत सायकल रिक्षाद्वारे दवंडी देण्यात आली होती. ही माहिती असल्याने केचे यांच्या निवासस्थानापुढे रविवारी सकाळपासूनच रांगा लागणे सुरू झाले. गहू, तांदूळ व अन्य किराणा स्वरूपात पिशव्या तयार होत्या. मात्र, गोरगरिबांची गर्दी वाढतच चालल्याने शेवटी एका सुज्ञ व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून गर्दी पांगविली. धान्यवाटप तत्काळ बंद करण्यात आले. केचे यांचे निवासस्थान ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. दरम्यान, काही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र ही घटना जमावबंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटत आहे. यासंदर्भात आमदार केचे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी खासदार रामदास तडस यांचा वाढदिवस साजरा झाला. मात्र, त्यांनी खबरदारी घेत गरजूंना घरोघरी जात धान्यवाटप केले होते. खासदारांचे उदाहरण आमदारांनी डोळ्यापुढे ठेवले असते तर हा प्रकार घडला नसता, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.

या कार्यक्रमाची पूर्वपरवानगी प्रशासनाकडून घेण्यात आली नव्हती. या संदर्भात चौकशी अहवाल तयार करून पुढील कारवाईचा विचार केला जाईल.
-हरीश धार्मिक, उपविभागीय अधिकारी, आर्वी

Web Title: Birthday cerebration from BJP MLA in Wardha district; rules failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.