श्वापदांनी केली शेतातील पिकाची नासाडी
By Admin | Updated: November 19, 2016 01:09 IST2016-11-19T01:09:03+5:302016-11-19T01:09:03+5:30
जंगली श्वापदांच्या हैदोसाने परिसरातील शेतकरी त्रस्त आहे. मात्र या श्वापदांचा बंदोबस्त करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.

श्वापदांनी केली शेतातील पिकाची नासाडी
शेतकरी हवालदिल : दोन एकरातील कपाशीचे पीक उद्ध्वस्त
चिकणी (जामणी) : जंगली श्वापदांच्या हैदोसाने परिसरातील शेतकरी त्रस्त आहे. मात्र या श्वापदांचा बंदोबस्त करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. याचा नाहक त्रास शेतकरी बांधवांना होत आहे. येथील शेतकरी मोरेश्वर देवराव घोडे यांच्या दोन एकरातील कपाशीचे पीक रानडुकरांनी उध्वस्त केले. या शेतकऱ्याने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
चिकणी शिवारात वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला आहे. शेतातील उभ्या पिकाची नासाडी करीत आहे. यामुळे शेताची रखवाली करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. उपाययोजना करुनही श्वापदांचा त्रास कमी झाला नाही. पीक उध्वस्त होताना पाहुने शेतकरी हवालदिल झाले आहे.(वार्ताहर)