दुचाकी समोरासमोर धडकल्या; एक ठार
By Admin | Updated: November 2, 2016 00:35 IST2016-11-02T00:35:26+5:302016-11-02T00:35:26+5:30
दुचाकीत समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले.

दुचाकी समोरासमोर धडकल्या; एक ठार
चार गंभीर : साखरबाहुली शिवारातील घटना
गिरड/समुद्रपूर : दुचाकीत समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना गिरड-समुद्रपूर मार्गावर असलेल्या साखरबाहुली शिवारात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
सतीश कोल्हे रा. धोंडगाव असे मृतकाचे नाव आहे तर अमोल सहस्त्रबुद्धे रा. धोंडगाव, संकेत फोपारे, ज्योत्सना फोपारे, शंकर फोपारे तिन्ही रा. सावंगी (वडगाव) अशी जखमींची नावे आहेत. या चारही जखमींना उपराचाकरिता वर्धेतील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पोलीस सुत्रानुसार, एम. एच. ३२ ए. डी. ४८२८ क्रमांकाची दुचाकी समुद्रपूर येथून गिरडकडे येत होती. दरम्यान एम. एच. ३२ टी. ०३०४ क्रमांकाची दुचाकी सिर्सीकडून समुद्रपूरकडे जात असताना दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या. या अपघातात सतीश कोल्हे, अमोल सहस्त्रबुद्धे, ज्योत्स्ना फोपारे (४०), शंकर फोपारे (२२) व साक्षी फोपारे (१३) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी जखमींना समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सतीश कोल्हे याला मृत घोषित केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. माहिती मिळताच गिरडचे ठाणेदार सुखराम थोटे, एस. सी. लाखे, गजानन घोडे, नितीन नागोसे, सचिन वाघमारे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची गिरड पोलिसांनी नोंद घेतली आहे.(वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)