वर्धेत दारूबंदीचे मोठे आव्हान
By Admin | Updated: April 30, 2017 01:00 IST2017-04-30T01:00:56+5:302017-04-30T01:00:56+5:30
जिल्ह्यात असलेली दारूबंदी पुर्णत्त्वास नेणे हेच एक मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्याकरिता असलेले कर्मचारी बळ कमी पडते.

वर्धेत दारूबंदीचे मोठे आव्हान
अंकीत गोयल यांचा खुलासा : अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज
वर्धा : जिल्ह्यात असलेली दारूबंदी पुर्णत्त्वास नेणे हेच एक मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्याकरिता असलेले कर्मचारी बळ कमी पडते. इतर गुन्ह्यांच्या तुलनेत विचार केल्यास दारूबंदी करण्याकरिता जिल्ह्याला अतिरिक्त कर्मचारी देण्याची गरज आहे. दारूबंदीची कारवाई करण्यातच कर्मचाऱ्यांचा वेळ आणि श्रम वाया जात असल्याने इतर प्रकरणात कार्यवाही करणे अवघड जात असल्याचा खुलासा जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
त्यांची वर्धेतून ठाणे येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. याची माहिती देताना ते बोलत होते. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असताना येथे मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत आहे. यावर आळा बसविण्याकरिता असलेले काही कर्मचारी काम करतात, तर अपवाद वगळता काहींकडून हयगय होते. जिल्ह्यातील दारूबंदी ही एकाच वेळी संपुष्टात आणणे शक्य नाही. ती निरंतर चालणारी प्रक्रीया आहे. यावर मार्ग म्हणून पकडण्यात आलेल्यांना शिक्षा होणे अनिवार्य आहे. याकरिता दारूबंदी कायदा अधिक कडक करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.
वर्धेत राजकीय
हस्तक्षेप नाही
वर्धा : वर्धेत काम करताना कधीच राजकीय लोकांचा त्रास झाला नसल्याचेही ते म्हणाले. कधी कोण्या प्रकरणात एखाद्या नेत्याचा फोन आल्यास त्यांना परिस्थितीची माहिती दिल्यास त्यांच्याकडून कधीच उलट विचारणा झाली नसल्याचेही त्यांनी कबूल केले.
जिल्ह्यात काम करताना प्रशासकीय बाब म्हणून काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी लागली, असा निर्णय घेणे गरजेचेच आहे. याशिवाय प्रशासकीय काम पूण होत नाही. आपण नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करतो तर मग कर्मचाऱ्यांवर का नाही, असेही ते म्हणाले.
शिवाय दारूबंदीकरिता या जिल्ह्यात नवजीवन योजना राबविण्याचा निर्णय घेतला. याचे समाधान आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता अनेकांकडून सहकार्य मिळाले. विशेष म्हणजे, ज्या गावांची या योजनेकरिता निवड करण्यात आली त्या गावात सुविधा पुरविण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष सहकार्य मिळाल्याचे त्यांनी कबूल केले.(प्रतिनिधी)
जिल्ह्यात गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढले
गुन्ह्याची माहिती पडल्यास त्यावर निर्बंध लावले, घडलेला गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे आणि त्याला शिक्षा होईल याचा प्रयत्न करणे, असे पोलिसांचे काम असल्याचे गोयल म्हणाले. यानुसार वर्धेत गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढले आहे. १० टक्क्यांवरून ते प्रमाण २५ ते २६ टक्क्यांवर आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात चार ठाण्यांना नवी इमारत
जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, कारंजा आणि तळेगाव (श्याजीपंत) येथील इमारतीचा समावेश असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. शिवाय कर्मचाऱ्यांकरिता नव्या वसाहतीही मिळणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.