सायकल यात्रेने ‘नो व्हेईकल डे’ची जनजागृती

By Admin | Updated: January 1, 2016 03:18 IST2016-01-01T03:18:49+5:302016-01-01T03:18:49+5:30

पर्यावरणाबाबत ‘लोकमत’ने मांडलेली संकल्पना व भूमिकेचा अंगिकार करीत देवळीकरांनी पहिल्या गुरूवारी ‘नो व्हेईकल

Bicycling 'No Vehicle Day' Public awareness | सायकल यात्रेने ‘नो व्हेईकल डे’ची जनजागृती

सायकल यात्रेने ‘नो व्हेईकल डे’ची जनजागृती

अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा समावेश : वर्धेत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची सायकलिंग
देवळी : पर्यावरणाबाबत ‘लोकमत’ने मांडलेली संकल्पना व भूमिकेचा अंगिकार करीत देवळीकरांनी पहिल्या गुरूवारी ‘नो व्हेईकल डे’चे उत्स्फूर्त स्वागत केले. खा. रामदास तडस यांचा पुढाकार व न.प. च्या सहकार्यातून सकाळी ८ वाजता सायकलची जनजागृती रॅली काढण्यात आली. या सायकल यात्रेच्या माध्यमातून ‘नो व्हेईकल डे’बाबत जनजागृती करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या सायकल यात्रेत शासकीय, निमशासकीय कर्मचारी, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, औद्योगिक वसाहतीतील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांचा सहभाग होता. नगराध्यक्ष शोभा तडस व तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रेमिला ढोक, नगरसेवक माला लाडेकर, जनता कनिष्ठ महा.च्या प्राचार्य संध्या कापसे व महिला पदाधिकारी उपस्थित होते. ‘नो व्हेईकल डे’च्या निमित्ताने शहरात उत्सूकता व कुतूहलाचे वातावरण होते. महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्साह अलौकिक होता. शहरातील रस्ते व गल्लीबोळातून खा. तडस सायकल चालवित असल्याचे पाहुन नागरिकांनाही आश्चर्यच वाटले.
या रॅलीत स्वत:च्या सायकलसह परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एम. दिदावत, मोहन गुजरकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर, डॉ. श्रावण साखरकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन दराडे, न.प. उपाध्यक्ष विजय गोमासे, शिक्षण सभापती विलास जोशी, बांधकाम सभापती दिलीप कारोटकर, नगरसेवक कृष्णा शेंडे, अब्दुल नईम, न.प. माध्यमिकचे मुख्याध्यापक भास्कर जुनेवार, प्रा. पंकज चोरे, प्रा. आचार्य, विविध कार्यकारीचे अध्यक्ष शरद आदमने, किरण तेलरांधे, महालक्ष्मी स्टीलचे प्रजावीर आचार्य, प्रकाश दुधकोहळे, देवानंद उराडे, आरोग्य विभागाचे विजय चिंचोळकर, प्रवीण चिंचुलकर, बबीता ताकसांडे, प्रवीण फटींग, आशीष इटनकर, शरद सातपुते, विष्णू कापसे, सुरेंद्र उमाटे, पोलीस कर्मचारी, महालक्ष्मी स्टीलचे कामगार, जनता कनिष्ठ महाविद्यालय व न.प. कनिष्ठ महा.चे विद्यार्थी, शिक्षक व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. सायकल रॅलीचा समारोप न.प. कार्यालयात करण्यात आला. याप्रसंगी आयोजित सभेत खा. रामदास तडस व तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी विचार व्यक्त केले. पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी आठवड्यातील प्रत्येक गुरूवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.(प्रतिनिधी)

जिल्हाधिकाऱ्यांचा आदर्श ‘नो व्हेईकल डे’
४जिल्हाधिकाऱ्यांचा ‘नो व्हेईकल डे’ खरोखरच आदर्श ठरला. सकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या जनजागृती रॅलीमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला. यानंतर सकाळी त्यांनी निवासस्थानावरून आपल्या गार्डसह पायी येत कार्यालय गाठले. शिवाय दिवसभर बाहेरचा एकही दौरा न ठेवता केवळ कार्यालयील कामकाज करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
४जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनीही सकाळी रॅलीत सहभाग घेतला; मात्र त्यांना नागपूर येथे काही कामानिमित्त जायचे असल्याने ते कार्यालयात पायी आले नाही.
४अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांनी निवासस्थानाहून पायी येत कार्यालय गाठले. त्यांनी कामाच्या गरजेनुसार वाहन वापरण्यात येईल, असे सांगितले.
वर्धेत दुसऱ्या गुरूवारीही जनजागृती
४‘लोकमत’ने घेतलेल्या इनिशिएटीव्हला वर्धेत बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असून सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही नो व्हेईकल डे बाबत सकारात्मक भूमिका घेतली. दुसऱ्या गुरूवारीही वर्धेत एक दिवस वाहने न वापरण्याबाबत जनजागृती सायकल यात्रा करीत जनजागृती केली.

Web Title: Bicycling 'No Vehicle Day' Public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.