ट्रॅक्टरच्या धडकेत सायकलस्वार ठार
By Admin | Updated: May 5, 2016 02:14 IST2016-05-05T02:14:58+5:302016-05-05T02:14:58+5:30
एका ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना नागठाणा पॉर्इंट येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ बुधवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास घडली.

ट्रॅक्टरच्या धडकेत सायकलस्वार ठार
वर्धा : एका ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना नागठाणा पॉर्इंट येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ बुधवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास घडली. सतीश तुकाराम किनगावकर, असे मृतकाचे नाव आहे. सतीश हा आपल्या सायकलने नागठाणा परिसरात सकाळी मजुरीसाठी जात होता. दरम्यान, ट्रॅक्टर क्र. एम.एच. ३१ ए. ११०८ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपूर्वक चालवून सतीशच्या सायकलने जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅॅक्टरचालकावर रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला.(शहर प्रतिनिधी)