संसदेपर्यंत सायकल चालवून कामकाज सांभाळणार
By Admin | Updated: March 7, 2016 01:58 IST2016-03-07T01:58:40+5:302016-03-07T01:58:40+5:30
संसदेच्या कामकाजात भाग घेण्यासाठी काही खासदार सायकल चालवित संसद गाठत असतात.

संसदेपर्यंत सायकल चालवून कामकाज सांभाळणार
रामदास तडस : ‘नो व्हेईकल डे’ जनजागृती
देवळी : संसदेच्या कामकाजात भाग घेण्यासाठी काही खासदार सायकल चालवित संसद गाठत असतात. यानंतर मीसुद्धा निवासापासून संसदेपर्यंत सायकल चालवून कामकाजात सहभाग घेणार असल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
शहरात अनेक संस्था, संघटना, शाळा, महा.च्या सहभागातून शनिवारी सायकल रॅली काढून नो व्हेईकल डे पाळण्यात आला. लोकमतचा उपक्रम म्हणून यानिमित्त खा. रामदास तडस यांच्या नेतृत्वात जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खा. तडस बोलत होते. उपस्थित सर्वांना त्यांनी ‘नो व्हेईकल डे’ची शपथही दिली. शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना प्रदूषणाच्या भस्मासुराचा नायनाट करण्यासाठी शपथ देण्यात आली. प्राचार्य संध्या कापसे यांनी खा. तडस यांच्यासह शाळेत आलेल्या सर्व सायकलस्वारांचे स्वागत केले. सुदृढ समाजव्यवस्थेसाठी नो व्हेईकल डे ची संकल्पना उपयोगी अशीच आहे, असे प्राचार्य कापसे यावेळी सांगितले. रॅलीत शोतोकॉन कराटे क्लबचे कराटेपटू, राजीव गांधी माध्यमिक विद्यालय, न.प. स्कूल, जनता हायस्कूल व महा.चे विद्यार्थी, शिक्षक, संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.(प्रतिनिधी)