स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी ग्रंथप्रदर्शन
By Admin | Updated: July 9, 2016 02:23 IST2016-07-09T02:23:34+5:302016-07-09T02:23:34+5:30
ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, साईनगर येथे स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन करण्यासाठी ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी ग्रंथप्रदर्शन
वर्धा : ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, साईनगर येथे स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन करण्यासाठी ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सीसीटीव्ही कॅमेराचा प्रारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम जगदीश चांडक यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आला.
या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना ग्रंथसाहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यावेळी बोलताना खा. रामदास तडस म्हणाले, वाचनालयातील स्पर्धा परिक्षेच्या गं्रथाच्या सहाय्याने बऱ्याच विद्यार्थी वाचकांना स्पर्धात्मक परीक्षेत उपयोग होईल. वाचकांकडून याचा उपयोग करण्यात येत आल्याची माहिती मिळाली कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी ग्रंथालयाच्या विकासाकरिता चार लाख रुपये निधी देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदीश चांडक यांनी वाचनालयातील सोयीबाबत माहिती दिली. तर नरांजे तसेच उपस्थित वाचकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यशवंत महाविद्यालय सेलू येथील ग्रंथपाल प्रकाश नाथे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त खा. तडस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. उमाजी नाल्हे यांनी खा. तडस यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर खा. तडस यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. किरण नागतोडे यांनी तर आभार डॉ. विष्णु भारंबे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. गोपाल हेलोंडे, प्रा. कृष्ण नागतोडे, डॉ. सुनील उरकुडकर, डॉ. मिलिंद घंगारे, धर्माधिकारी, शिंदे, वाचक, सभासद उपस्थित होते. शेखर मानकर, प्रवीण नगराळे, गजानन गुल्हाने यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)