भोसा अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:00 AM2020-02-15T06:00:00+5:302020-02-15T06:00:17+5:30

भोसा ग्रामस्थांसह सिंदी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी संयुक्त रित्या सदर घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरातील बाजार चौकातून मोर्चा काढला. मोर्चा बस स्थानक चौकात येताच विक्रृत मानसिकतेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर मोर्चा पोलीस ठाण्याच्या दिशेने मार्गक्रमण झाला.

Bhusa torture cases run fast in court | भोसा अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा

भोसा अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा

Next
ठळक मुद्देमागणी : सिंदी (रेल्वे)त निघाला निषेध मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : नजीकच्या भोसा येथील जि.प. शाळेतील मुख्याध्यापकाने शाळेतीलच दोन चिमुकल्यांवर लैगिंक अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपीला सिंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. असे असले तरी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आज सिंदी शहरात मोर्चा काढण्यात आला. मोर्चा पोलीस स्टेशन येथे धडकल्यावर विविध मागण्यांचे निवेदन समुद्रपूरचे नायब तहसीलदार के. डी. किरसार, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, सेलूचे ठाणेदार सुनील गाढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुने यांना सादर करण्यात आले.
भोसा ग्रामस्थांसह सिंदी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी संयुक्त रित्या सदर घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरातील बाजार चौकातून मोर्चा काढला. मोर्चा बस स्थानक चौकात येताच विक्रृत मानसिकतेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर मोर्चा पोलीस ठाण्याच्या दिशेने मार्गक्रमण झाला. मोर्चा पोलीस ठाण्याच्या परिसरात येताच आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार के. डी. किरसार, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, सेलूचे ठाणेदार सुनील गाढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुने यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. नराधम मुख्याध्यापक सतीश बजाईत याला कठोर शिक्षा देण्यात यावी. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. पीडितांची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ख्यातनाम वकिल उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. दोन्ही पीडित मुलींना शासकीय योजनेतून शासकीय मदत देण्यात यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. मोर्चात माजी आमदार राजू तिमांडे, काँग्रेसचे आशिष देवतळे, प्रहारचे जयंत तिजारे, आधार संघटनेचे विक्रम खडसे, भोसा येथील सरपंच पिंकी अंड्रस्कार, उपसरपंच नमिता महंतारे, नगरसेविका वनिता मदनकर, अजया साखळे, बबनराव हिंगणेकर, सुधाकर खेडकर, भाजपचे प्रविण सिर्शिकार, राकाँचे वसंता सिरसे, शेतकरी संघटनेचे प्रमोद शिद, सुधाकर घवघवे, तुषार हिंगणेकर, बाबाराव सोनटक्के, अशोक चि. कलोडे, गजानन खंडाळे, शिरीष डकरे, प्रभाकर कलोडे, अफझल बेरा, ओमप्रकाश राठी, रामेश्वर घंगारे, गुल्लू भंसाळी, शुभम झाडे, प्रविण अंड्रस्कार, शुभम महंतारे, प्रविण भारसाखरे, ज्ञानेश्वर चौधरी, मंगेश मिस्किन, सुरज आस्थानकार यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Bhusa torture cases run fast in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.