भोंदूबाबा गजाआड

By Admin | Updated: January 4, 2015 23:17 IST2015-01-04T23:17:10+5:302015-01-04T23:17:10+5:30

अंगात हनुमानजी येतात, यातून आपण असाध्य रोग, भुतबाधा, करणी आदी रोग दूर करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू बाबाविरूद्ध सिंदी (रेल्वे) पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Bhondubaba gajaad | भोंदूबाबा गजाआड

भोंदूबाबा गजाआड

उमरीतील घटना : सिंदी (रेल्वे) ठाण्यात गुन्हा दाखल
सिंदी (रेल्वे) : अंगात हनुमानजी येतात, यातून आपण असाध्य रोग, भुतबाधा, करणी आदी रोग दूर करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू बाबाविरूद्ध सिंदी (रेल्वे) पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना उमरी येथे घडली. या भोंदू बाबाचे नाव किशोर रमेश बाळसराफ (२८) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरा येथे किशोर बाळसराफ नावाचा युवकाच्या अंगात हुनमानजी येतो, तो असाध्य रोग बरे करतो, अशी चर्चा गावात होती. याची माहिती याच बाबाची नातलग असलेल्या महिलेला मिळाली. यात तीने शनिवारी (३ जानेवारी) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तिच्या पतीची प्रकृती सतत खराब राहते. त्याच्यावार औषधोपचाराचा परिणाम होत नाही, असे म्हणून या बाबाशी संपर्क साधला. यात भोंदूबाबाने तुच तुझ्या पतीला जेवणातून काही तरी देवून त्यांच्यावर करणी केली असा उलट आरोप केला. यामुळेच त्याची प्रकृती खराब राहते असे उत्तर महिलेला दिले.
यावरून सदर महिलेने भोंदूबाबाच्या या प्रकाराची माहिती अनिसनला दिली. माहितीवरून अंनिसचे गजेंद्र सुरकार यांनी भोंदूबाबाचे आश्रम गाठत त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तेव्हा भोंदूबाबा गचाट्यात सापडला. तो चांगलाच गोंधळला. यावरून सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मनुष्यबळी, इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक २०१३ कायद्यानुसार कलम २ (१), (ख), २, ५, ६ या कलामाद्वारे भोंदूबाबा किशोर बाळसराफ यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bhondubaba gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.