उत्कृष्ट कार्याबद्दल आरोग्य विभागातील
By Admin | Updated: October 29, 2016 00:58 IST2016-10-29T00:58:07+5:302016-10-29T00:58:07+5:30
जिल्हा परिषद आरोग्य विभाग व फार्मसी आॅफिसर असोसिएशन वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभ घेण्यात आला.

उत्कृष्ट कार्याबद्दल आरोग्य विभागातील
उत्कृष्ट कार्याबद्दल आरोग्य विभागातील
१७ अधिकारी सन्मानित
वर्धा : जिल्हा परिषद आरोग्य विभाग व फार्मसी आॅफिसर असोसिएशन वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभ घेण्यात आला. यात उत्कृष्ट औषध निर्माण अधिकारी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी १७ अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य सभापती वसंत आंबटकर, जि.प. सदस्य मोरेश्वर खोडके, जि.प. सदस्य हितेंद्र बोबडे, माजी सभापती निर्मला बिजवे, मनिषा वरकड, विना राऊत, उज्वला राऊत, भारती ठाकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, डॉ. राज गहलोत, डॉ. पारेकर, डॉ. रेवतकर, डॉ. झलके, खुशाल गुंडतवार यांची उपस्थिती होती.
नागपूर मंडळातील उत्कृष्ट औषध निर्माण अधिकारी पुरस्काराने सोज्वळ उघडे तर जिल्ह्यातील उत्कृष्ट औषध निर्माण अधिकारी म्हणून वैशाली कामडी यांना सन्मानित करण्यात आले. तालुकानिहाय पुरस्कारात वर्धा तालुक्यातून नामदेव डफळे, राजेंद्र कडूकर, देवळी येथून तुषार धात्रक, शैलेश मिश्रा, सुनील वंजारी तर सेलू येथील गोविंद राठोड, वैशाली भाकरे आर्वी येथील निलेश शास्त्री, श्याम घारड, अजय निखार तसेच आष्टी येथील प्रदीप ठाकरे तर कारंजा येथून तृप्ती देशमुख, पवन बोबडे, समुद्रपूर, किशोर डरंगे, हिंगणघाट येथील योगेश मरस्कोल्हे यांना सन्मानित करण्यात आले. संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी डॉ.आखरे, राहाटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्याम घारड, नरेंद्र लांजेवार, प्रदीप राठोड, मनोज पवार, अमोल कोल्हे, प्रितेश चपटे, नरेंद्र लांजेवार, डेकाटे यांनी सहकार्य केले. संचालन सचिन घोडे यांनी केले.(स्थानिक प्रतिनिधी)