शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

बापाच्या व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासाठी मुले मागतात भीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 12:09 IST

वर्धा शहराच्या विविध भागात लहान मुले दिवसभर भीक मागताना दिसून येतात. आपल्या वडिलांची व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासह स्वत:ची व्यसनाची गरज भागविण्यासाठी भिकेच्या पैशाचा वापर करताता. हे धक्कादायक वास्तव संकल्प संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

ठळक मुद्देवर्धेतील वास्तवसंकल्प संस्थेने केलेल्या पाहणीतील धक्कादायक वास्तव

अभिनय खोपडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराच्या विविध भागात लहान मुले दिवसभर भीक मागताना दिसून येतात. अनेकदा महिला व पुरूषांच्या जवळ जावून त्यांच्या मागे लागून त्यांना भीक देण्यासाठी जबरदस्ती करताना ही मुले दिसून येतात. मात्र या केविलवाण्या चेहऱ्यांमागे लपलेले वास्तव खुप भयावह आहे. हे मुले आपल्या वडिलांची व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासह स्वत:ची व्यसनाची गरज भागविण्यासाठी भिकेच्या पैशाचा वापर करताता. हे धक्कादायक वास्तव संकल्प संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.हा प्रकार अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. वर्धा शहरात अनेक चौकात दररोज लहान मुल व मुली भीक मागताना दिसून येतात. साधारणत: गर्दीच्या ठिकाणी अशा मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. काही लोक दया म्हणून या मुलांना पैसे देवून मोकळे होतात. मात्र कुठलेही काम न करता फुकटात मिळणाऱ्या या पैश्यामुळे लहान मुलांच्या भीक मागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे स्वत:चे व आई-वडिलांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी या भिकेच्या पैशाचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. रोठा परिसरात मंगेशी मून यांनी उमेद संस्थेद्वारा संचालित संकल्प शाळा सुरू केली. या शाळेत अनेक मुल-मुली शिकायला येतात. येथे मंगेश (नाव काल्पनिक आहे) नावाचा एक मुलगा शिकण्यासाठी आणण्यात आला. त्याला सहा महिने झाले. तो तेथे राहू लागला. मात्र व्यसन सुटले नाही. दहा वर्ष वयाच्या या मुलाला व्यसनाने पछाडलेले आहे. आई-वडील हे दोघेही चारही मुलांना भीक मागून आणायला सांगतात. त्यातून ते आपले व्यसन भागवून घेत. सोबतच या मुलांना व्यसनाची सवय लागली. मंगेशसह शबनम (नाव काल्पनिक आहे) ही व्यसनाधीन झाले. शबनम तंबाखू खायला लागली. तर मंगेश दारू, खर्रा, तंबाखू, गांजा अशा अनेक व्यसनाच्या आहारी गेला. लहानपणापासून त्याला या गोष्टींची लत जडली. भिक्षा मागून मिळालेला पैसा याला कुठेतरी कारणीभूत ठरत आहे. सहा महिन्यानंतर मंगेश पहिल्यांदा शाळेतून पळून गेला. कारण वसतीगृहाचे वातावरण त्याला असह्य झाले. त्याच्याजवळ पैसा राहत नव्हता. तेथे व्यसनही करता येत नव्हते. म्हणून त्याने कुणालाही न सांगता वसतीगृहातून पळ काढला आणि वर्धा शहर गाठले. शहरातील एका चहा कॅन्टींग मध्ये तो लपून बसला. इकडे संकल्प संस्थेत मंगेश पळून गेल्याने खळबळ उडाली. त्याचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम आखण्यात आली. त्यानंतर प्रकल्पातील मुले व या प्रकल्प चालविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता मंगेशी मून या त्याच्या शोधासाठी निघाल्या. मंगेशच्या बहिणीला त्याच्या लपण्याचा जागा ठाऊक असल्याने अखेरीस सोमवारच्या रात्री ११.३० तो सापडला. त्याच्या हाती पुन्हा भिक्षापात्र होते. ते रस्त्यातच फेकून देण्यात आले. त्याला प्रकल्पात परत आणण्यात आले. मात्र या घटनेने व्यसनाचा विळखा माणसाला कोणत्या थरापर्यंत नेऊ शकतो आणि यात कोवळ्या वयातील या मुलांचे बाल्य कसे खुरटले जात आहे याचा विचार करण्यास भाग पाडले आहे.

शहरात बालवयातील मुल भीक मागताना दिसून येतात. या मुलांना भीक देऊ नका. या भिकेच्या पैशातून हे मुले व्यसनाच्या विळख्यात ढकलेले जात आहेत. त्यामुळे समाजाने या मुलांना वही व पेन देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे.- मंगेशी मून-पुसाटेसंचालक, संकल्प संस्था, रोठा

या संदर्भात कायद्यात कोणतेही प्रावधान नाही. मात्र पोलीस विभागाकडून विविध जनजागृतीपर मोहीम राबवून लहान मुलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हरविलेल्या मुलांबाबत विशेष मोहीम राबवून त्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षीत पोहचविण्याची जबाबदारी पोलिसांनी पार पाडली आहे. सध्या वर्धा शहरात हे प्रकार कमी असले तरी जागृकता निर्माण करण्याची गरज आहे. चाईल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून ह्युमन ट्राफिकींग रोखण्याचा प्रयत्न करण्यात येतो. नागरिकांनाही अशी बालके आढळल्यास त्वरीत पोलिसांना कळवावे.- निर्मलादेवी एस.पोलीस अधीक्षक, वर्धा.

टॅग्स :Beggerभिकारी