राष्ट्रभावनेचे पुन:स्मरण व्हावे
By Admin | Updated: August 8, 2014 00:09 IST2014-08-08T00:09:01+5:302014-08-08T00:09:01+5:30
राष्ट्र या शब्दाचा अर्थ अलीकडे आमच्या मनातून पुसत चालला आहे. यास पुनर्जिवित करावे लागणार आहे. याकरिता राष्ट्रकवि मैथीलीशरण गुप्त यांच्या ‘भारत भारती’ यासारख्या काव्याची

राष्ट्रभावनेचे पुन:स्मरण व्हावे
वर्धा : राष्ट्र या शब्दाचा अर्थ अलीकडे आमच्या मनातून पुसत चालला आहे. यास पुनर्जिवित करावे लागणार आहे. याकरिता राष्ट्रकवि मैथीलीशरण गुप्त यांच्या ‘भारत भारती’ यासारख्या काव्याची नव्या पीढीस ओळख करून देण्याची अत्यंत गरज आहे. कारण भारत भारतीने देशात लोकचैतन्य निर्माण केले आहे.
नव्या पीढिस हा विचार देणे गरजेचे आहे, असे विचार महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलपती डॉ. गिरीश्वर मिश्र यांनी व्यक्त केले.
ते महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थान येथे आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांनी यावेळी उपस्थित युवकांना राष्ट्रहिताकरिता समर्पण भावाने कार्य करावे, आपली माती व आपल्या भाषेचा स्वाभिमान आपल्याला योग्य मार्गावर नेईल, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शंकरप्रसाद अग्निहोत्री, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे डॉ. एस. एस. पटेल, डॉ. सुरज पालीवाल, डॉ. बी. एस. गर्ग , डॉ. पातोंड उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांनी रचलेले मंगलचरण सादर केले. प्रकाश ठाकरे व संच यांनी मंगलचरण संगीतबद्ध केले होते.
यानंतर झालेल्या काव्यगोष्ठी कार्यक्रमात जिल्ह्यातील कवींनी सहभागी होत आपल्या शब्दशैली व प्रस्तुतीकरणाने श्रोत्यांचे मने जिंकली. कविगोष्ठी ची सुरुवात गुप्त यांची लोकप्रिय रचना ‘चारुचंद्र किरणे..’ गायनाने करण्यात आली.
या काव्यसंधेत डॉ. राजेश झा, डॉ. वर्षा पुनवटकर, संजय इंगळे तिगांवकर, अहसान राही, कमलकिशोर शर्मा, महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील डॉ. हरप्रित कौर, डॉ. अनवर सिद्दीकी, गिरडचे आरीफ काझी, हिंगणघाट मुद्गल इब्राहीम बक्श व कोचर गोल्डी, यवतमाळवरून प्रो. ताकसांडे, सेलूचे प्रा. राजेंद्र मुंडे, सेवाग्रामच्या डॉ. सुमन पांडे व डॉ. अनुपमा यांनी सहभागी होत काव्यपाठ सादर केले. यावेळी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमात आयोजन समितीचे प्रमुख डॉ. ओ. पी. गुप्ता यांनी प्रास्ताविकात मागील १७ वर्षापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
यावेळी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थान विद्यार्थी परिषद यांच्यावतीने आयोजित राष्ट्रकवि स्मृति स्वरचित हिन्दी काव्य पाठ स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनुपमा यांनी केले तर आभार डॉ. दिलीप गुप्ता यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाला विद्यार्थी, आयोजन समितीचे सदस्य व आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)