घातक शासन निर्णयाविरूद्ध लढण्याकरिता सज्ज राहा
By Admin | Updated: January 13, 2016 02:48 IST2016-01-13T02:48:57+5:302016-01-13T02:48:57+5:30
शासनाचे शिक्षण क्षेत्राविषयी उदासीन धोरण आणि वारंवार निघणाऱ्या घातक शासन निर्णयामुळे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये अस्थिरतेचे व भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घातक शासन निर्णयाविरूद्ध लढण्याकरिता सज्ज राहा
व्ही.यू. डायगव्हाणे : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अधिवेशन
वर्धा : शासनाचे शिक्षण क्षेत्राविषयी उदासीन धोरण आणि वारंवार निघणाऱ्या घातक शासन निर्णयामुळे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये अस्थिरतेचे व भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विरोधात लढा उभारण्यासाठी सर्वांनी एकजुटीने व एकसंघाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष व माजी शिक्षक आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांनी व्यक्त केले.
रविवारी वर्धा येथील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या सभागृहात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा अधिवेशन घेण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्रीवण बरडे यांनी केले. यावेळी मंचावर वर्धा एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रदीप बजाज, व्ही.के. पांडे, प्रा. डॉ. विलास ढोणे, दत्तात्रेय मिर्झापुरे, सतीश जगताप, आनंद कारामोरे, खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सचिव सुरेशकुमार बरे, वि.मा.शि. संघाचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले, विजयसिंह चंदेल आदी उपस्थित होते. मान्यवरांनी शिक्षकांच्या समस्या त्यांच्यासमोरील आव्हाने व त्यासाठी आवश्यक उपययोजना याविषयी माहिती दिली.
प्रास्ताविक व अहवालवाचन वि.मा.शि. संघाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष पांडुरंग भालशंकर यांनी केले. संचालन डॉ. शोभा बेलखोडे यांनी केले. कोषाध्यक्ष महेंद्र सालंकार यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हा कार्यकारी मंडळाची निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.आर. वाघमारे व पुरूषोत्तम पोफळी यांनी काम पाहिले. यात जिल्हाध्यक्ष म्हणून पांडुरंग भालशंकर, कार्यवाह महेंद्र सालंकार, उपाध्यक्ष शशिकांत वैद्य, धर्मपाल मानकर, सहकार्यवाह अनिल पोटदुखे, शीला पंचारिया तसेच कोषाध्यक्ष म्हणून शशांक हुलके निवडून आले. अधिवेशनात ७०० शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, कार्यवाह चंद्रशेखर जोरे, अरूण कहारे, राजेंद्र वसू, नीता काळे, अनिल पोटदुखे, व्ही. आर. इटणकर, भारत पाटील, इंद्रजित ढोले, प्रमोद खोडे, संभा घाटुर्ले, गोपाल खंडागळे, सुनील दुम्पलवार, अशोक घारे, विलास येंडे, अॅड. संजय घुडे, धर्मपाल मानकर, शशांक हुलके, श्याम चित्रकार, सुरेश बरे, संजय बावणकर, सुहास गवते, रामदास लाकडे, विजय वघळे, आशिष पोहाणे, घोडमारे, धवणे, राडे, गिरीश बोरकर, सरयाम, संजु शेगावकर, सचिन कठाणे, संदीप चवरे, नंदकिशोर ठाकरे, वामन कोंबे, राजू चंदनखेडे, बाबाराव घुमडे, सतीश लोखंडे, कुलभूषण ठाकरे, धर्मेश झाडे, शैलेंद्र बोकडे, नरेंद्र हुलके, फिरंगे, साळवे, तेलरांधे, अहेर, मोकद्दम, सालंकार आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)