सावधान ! आवळतोय मधुमेहाचा ‘गोड’ पाश
By Admin | Updated: November 13, 2014 23:06 IST2014-11-13T23:06:18+5:302014-11-13T23:06:18+5:30
भारतात मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण ६२.४७ टक्क्यांवर पोहचले आहे. जिल्ह्यातही मागील तीन वर्षांत विविध तपासणीत १५ हजार ३०० रुग्ण आढळले आहेत. या आकडेवारीला नियंत्रणात ठेवण्याकरिता जिल्हा

सावधान ! आवळतोय मधुमेहाचा ‘गोड’ पाश
श्रेया केले - वर्धा
भारतात मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण ६२.४७ टक्क्यांवर पोहचले आहे. जिल्ह्यातही मागील तीन वर्षांत विविध तपासणीत १५ हजार ३०० रुग्ण आढळले आहेत. या आकडेवारीला नियंत्रणात ठेवण्याकरिता जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून एनसीडी कार्यक्रम राबविण्यात येतो. या अंतर्गत प्रत्येक आरोग्य केंद्र, रुग्णालय, सामान्य रुग्णालय येथे अतिरिक्त कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे.
शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात असंसर्गजन्य आजार नियंत्रण सेल स्थापन करण्यात आला. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहे. रुग्णांची तपासणी करून यात संशयीत रुग्ण आढळल्यास त्याला औषधोपचार, आहार याबाबत समुपदेशन केले जाते. या कार्यक्रमांतर्गत ३० वर्षांवरील रुग्णांचे निदान केले जाते. स्क्रीनींगमध्ये रुग्ण आढळल्यास त्याचा पाठपुरावा आरोग्य कर्मचारी घेतात. शिवाय तपासणी मोफत केली जाते. वर्धा जिल्ह्यातून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रुग्णांचे निदान लवकर करण्याकरिता ग्लुकोमीटर डिजीटल बी.पी. अॅप्रटस असे उपकरणे शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिल्याची माहिती संबंधितांनी दिली.