सावधान! स्वाईन फ्ल्यूचा धोका
By Admin | Updated: February 5, 2015 23:13 IST2015-02-05T23:13:01+5:302015-02-05T23:13:01+5:30
स्वाईन फ्ल्यूने विदर्भात दस्तक दिली आहे. यामध्ये हिंगणघाट येथील एका तरुणाला या आजाराने पछाडले असून तो नागपुरातील मेडीकल रुग्णालयात उपचार घेत आहे.

सावधान! स्वाईन फ्ल्यूचा धोका
वर्धा : स्वाईन फ्ल्यूने विदर्भात दस्तक दिली आहे. यामध्ये हिंगणघाट येथील एका तरुणाला या आजाराने पछाडले असून तो नागपुरातील मेडीकल रुग्णालयात उपचार घेत आहे. आ आजारापासून जनतेनी खबरदारी घ्यावी म्हणून जिल्हात आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या आजाराने जिल्ह्यात डोके वर काढण्याची भीती बळावली आहे; परंतु योग्य काळजी घेतल्यास या आजारापासून दूर राहता येणे शक्य आहे. हा आजार एच १ एन १ या विषाणूमुळे होतो. ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या आदी लक्षणे आढळतात. मात्र, घाबरून न जाता योग्य काळजी घेतली तर निश्चितच या आजारावर नियंत्रण ठेवता येते, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.(प्रतिनिधी)
यंत्रणा सज्ज, औषधीही उपलब्ध
नागरिकांनी स्वाईन फ्ल्यू या आजाराची भीती बाळगू नये, योग्य काळजी घेतल्यास हा आजार सहज टाळता येऊ शकतो, फ्ल्यूची लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावा, आपल्या जवळच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही त्याची माहिती द्यावी. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणाही सज्ज आहे. याचाही नारिकांनी लाभ घ्यायलाच हवा, असे आवाहनही जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
काय करावे व काय करू नये
रूग्णांच्या संपर्कानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत
घरातील हवा मोकळी राहील याची दक्षता घ्यावी.
आरोग्यदायी सवयींचे कटाक्षाने पालन करावं.
आपले नाक व तोंड रूमालांनी झाकावे, शिंक आल्यास तोंड व नाक झाकून घ्यावे.
गर्दीत मास्कचा वापर करावा.