सावधान ! सार्वजनिक स्थळी थुंकणे पडेल १२०० रुपयांत
By Admin | Updated: July 20, 2014 00:03 IST2014-07-20T00:03:56+5:302014-07-20T00:03:56+5:30
खर्रा, पान खावून जर सार्वजनिक ठिकाणी तुम्ही पचापच थुंकत असाल तर सावधान ! आता हे थुंकणे तुम्हाला १२०० रुपयात पडणार आहे. थुंकण्याच्या या सवईमुळे शासकीय कार्यालयांचे व सार्वजनिक

सावधान ! सार्वजनिक स्थळी थुंकणे पडेल १२०० रुपयांत
मुंबई पोलीस अधिनियमाची कलम ११३ लागू
गौरव देशमुख - वायगाव(निपाणी)
खर्रा, पान खावून जर सार्वजनिक ठिकाणी तुम्ही पचापच थुंकत असाल तर सावधान ! आता हे थुंकणे तुम्हाला १२०० रुपयात पडणार आहे. थुंकण्याच्या या सवईमुळे शासकीय कार्यालयांचे व सार्वजनिक जागांचे विद्रुपीकरण झाले आहे. शिवाय रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने संसर्गजन्य आजारात वाढ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्य शासनाने सार्वजनिक स्थळी थुंकणाऱ्यांवर आता कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. थुंकणाऱ्यांवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ११६ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. क्षयरोग, स्वार्ईन फ्ल्यू, न्यूमोनिया यासारख्या आजाराचा फैलाव होतो़ केंद्र शासनाच्या सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सन २०१२ च्या अहवालानुसार देशातील ३४ लक्षांपैकी राज्यातील ७५ हजार ३१९ नागरिक क्षयरोगाने पीडित आहेत़ या रोगाने भारतातील तीन लक्ष लोक मृत्यूमूखी पडले आहेत. राज्यातील मृतांची संख्या ६ हजार ६९२ इतकी आहे़ सार्वजनिक ठिकाणी थुंकून भिंती खराब होऊन सार्वजनिक मालमत्ता विद्रुप होते़ या भिंती पुन्हा रंगविण्यासाठी जनतेने कर रूपाने दिलेला पैसा खर्च करणे प्रशानाला भाग पडते़
थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर होतेच; पण त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊन कर्करोग, श्वसनाचे आजार पुनरूत्पादन संख्येचे आजार, पंचनसंस्थेचे आजार, या सारख्या प्राणघातक आजाराची लागण होते़ सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे पसरणारे विविध आजार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी विचारात घेता मुंबई पोलीस अधिनियमाची कलम ११६ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे.