शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

सावधान! मास्कचा काळाबाजार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 5:00 AM

एन-९५ या ट्रिपल लेअर मास्कची मागणी वाढली. त्यामुळे आता एन-९५ च्या नावाखाली बनावट मास्कचीही विक्री होत आहे. रस्त्यांवर शेंगदाणे-फुटाण्यांची विक्री होते, त्याचप्रमाणे सर्जिकल मास्कची विक्री होऊ लागली आहे.

ठळक मुद्देसंसर्गाचा धोका : ठिकठिकाणी मुखपट्टी विक्रीचे थाटले स्टॉल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने केवळ आजारी व्यक्ती आणि रुग्णांवर उपचार करणाऱ्या व्यक्ती यांनीच मास्क लावावा, अशा सूचना दिल्या होत्या. नंतरच्या काळात मास्क वापरणे सर्वांसाठीच बंधकारक करण्यात आले. त्यातच एन-९५ या ट्रिपल लेअर मास्कची मागणी वाढली. त्यामुळे आता एन-९५ च्या नावाखाली बनावट मास्कचीही विक्री होत आहे. रस्त्यांवर शेंगदाणे-फुटाण्यांची विक्री होते, त्याचप्रमाणे सर्जिकल मास्कची विक्री होऊ लागली आहे.एन-९५ फिल्टर, एन-९५ विदाऊट फिल्टर, सर्जिकल, डबल लेअर, फाईव्ह लेअर मास्क, केएन-९५, पोल्यूशन मास्क आदी अनेक मास्कचे विविध प्रकार आहेत. मात्र, आता शहरात एन-९५ या मास्कचा वापर अधिक होत आहे. त्यातच बाजारात सर्जिकल ग्रीन मास्कचा वापरही अधिक आहे.एन-९५ या मास्कची मागणी वाढल्याने उत्पादनही वाढले आहे. सध्या १२० ते २०० रुपयांपर्यंत हा मास्क मिळतो. मात्र, बºयाच ठिकाणी आता एन-९५ च्या जागेवर बनावट मास्कही दिले जात आहेत. इतकेच नव्हे तर शहरातील रस्त्यांवरही स्टॉल लावून बनावट मास्कची विक्री होत असल्याचे चित्र आहे.चार - आठ दिवस मास्क वापरुन तो टाकून दिला जातो. त्यामुळे शहरात संसर्ग वाढण्याची भीती आहे. वापरकर्त्यांनी मास्क वापरून झाल्यानंतर तो जाळून नष्ट करणे, किंवा वॉशेबल मास्क घेवून तो धुवून पुन्हा वापरणे अपेक्षित आहे.मार्च-एप्रिल महिन्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांनी एन-९५ मास्क वापरावा, असे शासनाने सांगितले होते. रुग्ण व बाधितांच्या थेट संपर्कात येणाºया आरोग्य कर्मचाºयांसाठी तसेच हाय रिस्कमधील व्यक्तींसाठी एन-९५ मास्क वापरला गेला. मात्र, एन-९५ व नामसदृष्य के-९५, केएन-९५ असे मास्कही मिळायला लागले आहेत. एन-९५ म्हणून अन्य मास्कचीही विक्री केली जात आहे. याची प्रशासनाने दखल घेत कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.असा ओळखा खरा एन-९५ मास्कअस्सल एन-९५ मास्क हा तीन लेअरच्या कपड्यापासून तयार केला जातो. या मास्कच्या सोबत आतील भागात आरोग्याविषयीची सूचना नमूद असते. यासोबतच मास्कनिर्मिती करणाºया कंपनीची संपूर्ण माहिती व संपर्क क्रमांकही दिला जातो. ग्राहक या क्रमांकावर संपर्क साधून मास्क बाबत माहिती जाणून घेऊ शकतो, किंवा काही तक्रार असेल तर करु शकतो. इतर बनावट मास्कमध्ये ही माहिती नसते.एन-९५ च्या मास्कची अधीकृत किंमत अडीशचे रुपये असून बाजारपेठेते तो मास्क १२० ते १३0 रुपयांला विक्रीस आहे. याचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. कुणीही एमआरपीपेक्षा जास्त दरात मास्क विकू शकत नाही. मात्र, क्वालीटी कंट्रोलवर लक्ष देण्याची गरज आहे.- नवल मानधनिया, अध्यक्ष केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन वर्धाएन-९५ चे मास्क केवळ रु ग्ण आणि डॉक्टरांनाच वापरायचे असून शहरातील मेडीकलमध्ये मिळणाºया मास्कचे दर वधारले आहे. शासनाने याची दखल घेत हे मास्क नागरिकांना ३० ते ४० रुपयांत उपलब्ध करून देण्याची गरज आहे.- डॉ. संजय मोगरे, अध्यक्ष आयएमएखºया मास्कच्या आतमध्ये आत्मनिर्भरचा उल्लेखकोरोनाच्या पूर्वी एन-९५ मास्कचे उत्पादन अल्प होते. कोरोनानंतर आता आत्मनिर्भर भारत असे लिहिलेले व राज्यातच निर्मिती झालेले एन- ९५ मास्कही विक्रीसाठी आले आहेत. सर्वसामान्यही एन-९५ च्या नावाने इतर बनावट मास्क खरेदी करत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या