भाविकांना मिळाला खडतर मार्गावर आधार
By Admin | Updated: February 20, 2015 01:37 IST2015-02-20T01:37:43+5:302015-02-20T01:37:43+5:30
ढगा येथे महाशिवरात्रीदरम्यान भरणाऱ्या यात्रेत प्रहार संघटनेच्यावतीने यात्रेकरूंना सहकार्य करण्याकरिता १६ ते १८ फेब्रुवारी विशेष मोहिम राबविली.

भाविकांना मिळाला खडतर मार्गावर आधार
वर्धा : ढगा येथे महाशिवरात्रीदरम्यान भरणाऱ्या यात्रेत प्रहार संघटनेच्यावतीने यात्रेकरूंना सहकार्य करण्याकरिता १६ ते १८ फेब्रुवारी विशेष मोहिम राबविली. प्रहारचा हा उपक्रम गत २० वर्षांपासून सुरू आहे. यात यंदाच्या यात्रेत ‘महाशिवरात्री सेवा प्रकल्प’ राबविण्यात आला.
चौरागडाच्या पायथ्याशी असलेल्या दगडाच्या कपारितीतील ‘शिवलिंगा’चे दर्शन घेण्यासाठी तसेच चौरागडावर असलेल्या मंदिरात जाण्याकरिता भाविकांची गर्दी उसळते. अरूंद रस्ता व पर्यटनाच्या दृष्टीने सुविधा नसल्यामुळे गत २० वर्षांपासून प्रहारचे अध्यक्ष तथा गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक प्रा. मोहन गुजरकर यांच्या पुढाकाराने ‘प्रहार’ समाज जागृती संस्थेच्यावतीने स्वयंसेवक तसेच देवळीच्या एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील नेजाती सुभाषचंद्र बोस रोव्हर पथक व राष्ट्रीय छात्र सेना युनिट ‘महाशिवरात्री सेवा प्रकल्प’ राबविला. प्रहार संस्थेसह खरांगणा परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी देवराव टाले यांच्या पुढाकाराने लादगड, मासोद व ढगा या ग्रामवासियांची ‘वन व्यवस्थापन समिती’, वन विभागाचे कर्मचारी व ग्रामवासी यात्रा व्यवस्थापनाचे कार्य उत्कृष्ट पद्धतीने पार पाडत असतात. त्यांना यंदाच्या यात्रेत नागपूर राखीव पोलीस दल, स्थानिक पोलीस विभाग व गृह रक्षक दलाने सहकार्य केले.
संस्थेच्यावतीने राबविलेला सेवा प्रकल्प रोव्हर लिडर प्रा. मोहन गुजररकर, सचिव संतोष तुरक, प्रा. रविंद्र गुजरकर, अश्विनी घोडखांदे यांनी २५ रोव्हर्स, १२ रेंजर्स व प्रहार स्वयंसेवकाच्या मदतीने यशस्वी केला.
यात रोव्हर सुरज वानखेडे, कुणाल कांबळे, प्रवीण येरूरकर, अभिजित संसारे, साकिब पठाण, सुजित डुकरे, समिश डहाके, शुभम पारवे, संकेत मोघे, सौरभ ब्राह्मणे, सुमित तेलरांधे, रोशन भोयर, किशोर कानेटकर, शुभम बलविर, रेंजर अश्विनी मरापे, कोमल जांभुळकर, निकिता करपाते, तृप्ती होरे, दीक्षा खैरकार, अमृता जाधव, करिश्मा वाघमारे, मयुरी घोडखांदे, अश्विनी मुनेश्वर व स्काऊट कर्मचारी रितेश जयस्वाल यांच्यासह रोव्हर्स रेंजर्सचा सहभाग होता. त्यांना अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.(स्थानिक प्रतिनिधी)