खरीप हंगामासाठी आधारभूत किंमत जाहीर
By Admin | Updated: December 3, 2014 22:56 IST2014-12-03T22:56:00+5:302014-12-03T22:56:00+5:30
किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत २०१४-१५ च्या खरीप पणन हंगामासाठी केंद्र शासनाने ज्वारी, बाजरी, मका व भरड धान्याच्या आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. शेतकऱ्यांकरिता शासकीय

खरीप हंगामासाठी आधारभूत किंमत जाहीर
वर्धा : किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत २०१४-१५ च्या खरीप पणन हंगामासाठी केंद्र शासनाने ज्वारी, बाजरी, मका व भरड धान्याच्या आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. शेतकऱ्यांकरिता शासकीय खरेदी केंद्रेही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांनी दिली़
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा या हेतूने जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केल्यानुसार ज्वारी व बाजरी खरेदी केंद्रांना मंजुरीही प्रदान करण्यात आली आहे. या खरेदी केंद्रावर केवळ ‘एफएक्यू’ दर्जाचे धान्य खरेदी केले जाणार आहे़ कोणत्याही परिस्थितीत नॉन एफएक्यू दर्जाच्या धान्याची खरेदी केली जाणार नाही. खरेदीचा कालावधी १ नोव्हेंबर ते ३१ मार्च २०१४, असा राहणार आहे़ खरेदीदर ज्वारी (मालदांडी) १५५० रुपये, ज्वारी (संकरित) १५३० रुपये, बाजरी १२५० रुपये प्रती क्विंटल तर मका १३१० रुपये प्रति क्विंटल आहे. दराने खालील उपअभिकर्त्यामार्फत करण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवरच आधारभूत दराने विक्री करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे़
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेखाली ज्वारी संकरित ज्वारी मालदांडी, बाजरी व मक्याचे दर ठरवून देण्यात आलेले आहेत़ या दरानुसारच शेतमालाची खरेदी करण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हमी दराने ज्वारी संकरीत, ज्वारी मालदांडी, बाजरी, मका विक्री करीता वर नमूद केंद्रावर विक्री करावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
खरीप हंगामातील शेतमालासाठी शासनाच्यावतीने हे हमीभाव जाहीर करण्यात आले आहे़ शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांद्वारे लूट होऊ नये म्हणून शासकीय खरेदी केंद्रेही सुरू केली आहेत़ शेतकऱ्यांनी या केंद्रांवर माल विकावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सोना यांनी केले़(कार्यालय प्रतिनिधी)