उड्डाण पुलावर बॅरिकेटस् लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:17 IST2017-10-20T23:17:42+5:302017-10-20T23:17:53+5:30
येथील उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

उड्डाण पुलावर बॅरिकेटस् लावा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हिंगणघाट शहरातून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेटस् लावण्याची मागणी आहे.
उड्डाणपुलावर बॅरीगेटस् लावण्याकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने याकडे लक्ष देत उड्डाणपुलावर बॅरिकेटस् लावून उडाणपूलावरील खड्डे त्वरित बुजवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अजय मडावी युथ फाउंडेशनद्वारे देण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन सादर करण्यात आले. हिंगणघाट शहरातून गेलेल्या उड्डाणपुलावर नेहमीच जड वाहनांची वर्दळ असते. जड वाहनांमुळे रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येत्या काही दिवसात हिंगणघाट शहरातून गेलेल्या उडाणपुलावर बॅरिकेटस् लावून जड वाहनांची ये-जा बंद करुन उड्डाण पुलावरील जीवघेणे खड्डे तात्काळ न बुजविल्यास अजय मडावी युथ फाउंडेशनच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या मार्गावर अनेक विद्यालय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जड वाहनांच्या ये-जा करण्यावरून ऐरणीवर आला आहे. अनेक जड वाहनचालक आपल्या ताब्यातील वाहने भरधाव न निष्काळजी पणाने चालवत असल्याने हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. या प्रकाराकडे संबंधीत अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याने सर्व सामान्य जनतेच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. जड वाहनांवर कारवाई करणे क्रमप्राप्त असताना स्थानिक पोलीस केवळ दारूपकडण्यातच व्यस्थ असल्याचे दिसते. संभाव्य धोका लक्षात घेता स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाºयांसह संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या रेल्वे गेट या रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. सदर पुलावरील जीवघेणे खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू करण्याची मागणी यावेळी रेटण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्त्व लिलाधर मडावी, भिशांत कोल्हे, भरत शिंदे, रोहीत मांडवकर, रूषी देवगीरकर, सागर महाजन, पंकज यादव, मंथन चव्हाण, जाखोटिया, अनिकेत सहारे, विक्की जुमडे, प्रसाद धनवटे, कुणाल नगराळे यांनी केले. निवेदन देताना तरुण-तरूणी उपस्थित होत्या.