न्युक्लियर समस्येवर बापूंचे विचार आशादायी

By Admin | Updated: November 22, 2014 01:38 IST2014-11-22T01:38:47+5:302014-11-22T01:38:47+5:30

न्युक्लियर समस्येसोबतच जपानमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. भोगवाद वाढल्याने चंगळवादी प्रवृत्ती बळावली आहे.

Bapu's thoughts are optimistic on the Nuclear issue | न्युक्लियर समस्येवर बापूंचे विचार आशादायी

न्युक्लियर समस्येवर बापूंचे विचार आशादायी

दिलीप चव्हाण सेवाग्राम
न्युक्लियर समस्येसोबतच जपानमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. भोगवाद वाढल्याने चंगळवादी प्रवृत्ती बळावली आहे. आधुनिकतेकडे कल वाढला आहे. यामुळे दुरावा वाढत आहे. माणूसकी हरविली आहे. त्सुनामीचे संकट आले. याची सर्वांना माहिती आहे. पण समाजातील हे संकट दूर कोण करणार. असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. प्रत्येकाला शांती हवी, सुख हवे, हे खरेदीतून मिळणार नाही. हे सर्व मिळणार केवळ बापूंच्या विचारातूनच, असा आशावाद व्यक्त केला आहे जपानची कावेरी कुरिहारा या ३० वर्षीय युवतीने. बापूंच्या ‘अस्वस्थ’ या पुस्तकात असलेल्या विचाराने ती पुरती भारावली आहे.
कावेरी नुकतीच सेवाग्राम आश्रमात नारायणभाई देसाई यांच्यासोबत आली होती. ती गुजरात विद्यापीठामध्ये गांधीजींचे आश्रम प्रयोग यावर आचार्यपदवी करीत आहे. २०१० पासून ती अहमदाबाद विद्यापीठात असल्याचे तीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कावेरी बी.ए. झाली असून आई वडीलांची एकुलती एक मुलगी आहे. बीएला असताना समाज आणि जगातील घडामांडीचा बारकाईने विचार करीत आहे. यांत्रिक युग, चाकोरीबद्ध जीवन, आधुनिकतेचा भडीमार, समाज जाणीवेपासून फारकत घेतलेली युवापिढी आणि मुल्यांचा ऱ्हास यामुळे तिची अस्वस्थता वाढीस लागली. गांधीजींच्या पुस्तकामुळे तिला प्रेरणा मिळाली. वास्तविक जीवन काय याचे ज्ञान झाले. यातून प्रभावित होऊन तिने गांधीजींच्या विचाराचा अभ्यास करावा असा विचार आई वडिलांना बोलून दाखविला. भारतात जाण्यास मात्र आई वडिलांनी विरोध दर्शविला. गांधी विचार कावेरीला स्वस्थ बसू देत नव्हता. बी.ए. नंतर नोकरी केली. आवश्यक तेवढा पैसा जमविला आणि सरळ गुजरात गाठले. तिला हिंदीचे सुद्धा उत्तम ज्ञान आहे. यामुळे तिने गांधी विचाराचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.सेवाग्राम आश्रमाला भेट देण्याची तिची इच्छा पूर्ण झाल्याचे समाधन कावेरीने व्यक्त केले.

Web Title: Bapu's thoughts are optimistic on the Nuclear issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.