बापटनगरात घरफोडी
By Admin | Updated: February 25, 2017 00:44 IST2017-02-25T00:44:48+5:302017-02-25T00:44:48+5:30
काही दिवसांपासून शहरात ब्रेक बसलेल्या चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी रात्री घरातील सर्व मंडळी गाढ झोपेत असताना

बापटनगरात घरफोडी
रोख व सोन्याच्या ऐवजासह ३.५४ लाखांचा मुद्देमाल लंपास
वर्धा : काही दिवसांपासून शहरात ब्रेक बसलेल्या चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी रात्री घरातील सर्व मंडळी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख व सोन्या चांदीच्या ऐवजासह रोख असा एकूण ३ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बापटनगर परिसरात शुक्रवारी सकाळी उघड झाली.
घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी चोरट्यांच्या हाताचे ठसेही घेण्यात आले. श्वान पथकालाही पाचारण केले होते. मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही. शिवाय चोरट्यांनी कुठलाही सुगावा ठेवला नसल्याने चोरटे नेमके कोण आणि कुठे पळाले याचा कुठलाही पत्ता पोलिसांना मिळाला नाही.
पोलीस सुत्रानुसार, राजेश चौधरी हे कुटुंबियांसह घरातील हॉलमध्ये झोपून होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्याने शयनकक्षातील आलमारीतून २० हजार रुपये रोखसह सोन्याचा ऐवज असा एकूण ३ लाख ५४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे चौधरी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत. वर्धेत घडलेल्या बऱ्याच चोऱ्या अद्याप उघड झाल्या नसून यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसते.(शहर प्रतिनिधी)