शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
7
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
8
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
9
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
10
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
11
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
12
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
13
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
14
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
15
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
16
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
17
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
18
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
19
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
20
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण

वरुणराजाच्या कृपादृष्टीने बळीराजा प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा तालुका वगळता इतर सहाही तालुक्यामध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात एकूण ७३.२३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक सेलू तालुक्यात २१.४० मि.मी. तर समुद्रपूर तालुक्यात १७.३८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतशिवारात पाणी साचले आहे.

ठळक मुद्देपिकांना संजीवनी : जिल्ह्यात ७३.२३ मि.मी.पावसाची नोंद, नदी-नाल्यांना आला पूर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वरुणराजाने गेल्या काही दिवसांपासून पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतीपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू होती. काही भागात सिंचनाच्या माध्यमातून पिकांना जगण्याचा आधार दिला जात होता. अशातच बुधवारी रात्रीपासून वरुणाची कृपादृष्टी झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्याही काहीसा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा तालुका वगळता इतर सहाही तालुक्यामध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात एकूण ७३.२३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक सेलू तालुक्यात २१.४० मि.मी. तर समुद्रपूर तालुक्यात १७.३८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतशिवारात पाणी साचले आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूकही प्रभावित झाली होती. सेलू तालुक्यातील बोर नदीला पूर आल्याने जयपूर येथील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या गावातील नागरिक पुलाच्या पलीकडे अडकून पडले होते. त्यांना पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही ठिकाणी निर्माण झाली होती. 

सिंदी-दहेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प- सिंदी (रेल्वे): बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजतापासून सुरु झालेल्या पावसामुळे सिंदी-दहेगाव मार्गावरील पिपरा गावातील नाल्याला पूर आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बऱ्याच वेळेपर्यंत ठप्प झाली होती. थोडाही पाऊस आला तरी या नाल्याला पूर येत असल्याने नांगरिकांसह शेतकऱ्यांना दरवर्षीच पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. येथील नारिकांनी अनेकदा या नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी आमदार, खासदारांसह जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मात्र, या मागणीकडे कुणीही लक्ष दिले नसल्याने समस्या कायम आहे. आतातरी ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.

सेवाग्रामातील मेडिकल चौक झाला जलयम- सेवाग्राम: बुधवारी सायंकाळपासून परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान झळकत होते. या पावसामुळे शेतशिवारातील विहीर, नदी, नाले व तलावाच्या पाणीपातळीतही भर पडली आहे. तसेच या पावसामुळे मेडीकल चौकात पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. या पावसातून वाहन काढताना ते आडवे होत होते. या साचलेल्या पाण्यामुळे किरकोळ अपघात होऊन अनेकांच्या अंगावर चिखल उडाल्याने संतापही व्यक्त होत होता. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था असल्याने पुढे काय? असा प्रश्न दिनेश पवार व दिलीप शेंद्रे आदी नागरिकांनी व्यक्त केला. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विकास कामे केली जात असून अद्यापही ती पूर्णत्वास गेलेली नाहीत. मेडीकल चौकातील नालीचे काम आणि रस्त्याचे काम रेंगाळले असल्याने पाणी निघायला जागा नाही. त्यामुळे या चौकात तलाव साचला आहे.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी