बळी हा बहुजन समाजाचा हितचिंतक राजा
By Admin | Updated: November 16, 2015 00:38 IST2015-11-16T00:38:35+5:302015-11-16T00:38:35+5:30
बहुजन समाजाच्या उध्दाराकरिता आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या सम्राट बळीराजाचे आपण वंशज आहोत.

बळी हा बहुजन समाजाचा हितचिंतक राजा
गणेश हलकारे : मराठा संघाचा मेळावा
आर्वी : बहुजन समाजाच्या उध्दाराकरिता आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या सम्राट बळीराजाचे आपण वंशज आहोत. पुर्वीच्या काळी धर्मसंस्थेने इतिहास लिहण्याचा अधिकार ठराविक लोकांनाच दिला होता. त्यामुळे सत्य लपविण्यात आले. बळीराजा हा बहुजन समाजाचा हितचिंतक होता, हे विसरता येणे शक्य नाही, असे मत अॅड. गणेश हलकारे यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बळी महोत्सव येथील गांधी विद्यालयात शनिवारी साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष सुभाष अंधारे होते. माजी आमदार दादाराव केचे, सरचिटणीस सुधीर गिऱ्हे, आर्वी शाखा अध्यक्ष वीरेंद्र कडू, प्राचार्य बाळकृष्ण केचे आदी प्रमुख अतिथी होते.
पुढे बोलताना हलकारे म्हणाले, समाजातील बहुजनांना जागृत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. दाभोळकर, अॅड. पानसरे व कलबुर्गी यांची हत्या करून पुरोगामी विचारधारा संपविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. समाजातील धर्म आणि धार्मिकता संपली असून केवळ धर्मांधता उरली आहे, असे प्रतिपादन केले.
यानंतर मान्यवरांनी समायोचित विचार व्यक्त केले. अत्यल्प शेतीच्या भरवश्यावर आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन उच्चविद्याविभूषित करणाऱ्या आष्टी तालुक्यातील खडकी येथील शेतकरी सुरेश ढगे, नांदपूर येथील प्रमोद जगताप यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मराठा सेवा संघाचे मावळते अध्यक्ष बाळकृष्ण केचे यांचा गौरव केला.
कार्यक्रमाची प्रस्तावना राजकुमार तिरभाने यांनी मांडली. संचालन संतोष डंभारे यांनी केले तर आभार पंजाबराव गोंदाणे यांनी मानले. कार्यक्रमाला रवींद्र ठाकरे, प्रा. सुधाकर भुयार, प्रशांत नेपटे, अजय काकडे, प्रशांत एकापुरे, विजय मारोडकर, मंगेश कदम, प्रशांत ढवळे, दशरथ जाधव, विजय चौधरी, प्रा. अनिल कवरासे, शेखर पालेकर, प्रवीण पावडे, सचिन दिघडे, नितीन दिघडे, प्रशांत जळीत, विजय देशमुख, प्रफुल मनवर, वैशाली एकापुरे, शिरपुरकर, कीर्तिमाला ढगे आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)